पठाण बाॅक्स ऑफीसवर घसरला, एका दिवसात फक्त ‘इतक्या’ रूपयांची कमाई

मुंबई | बाॅलिवूड अभिनेता शाहरूख खान(Shah Rukh Khan)आणि अभिनेत्री दीपिका पादुकोनचा(Deepika Padukone) ‘पठाण'(Pathaan) हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. परंतु हा चित्रपट रिलीज होण्याच्या आधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

बाॅक्स ऑफीसवर मात्र पठाण चांगली कमाई करताना दिसून येत होता. चित्रपटगृहात पठाण पाहण्यास मोठ्या संख्येने प्रेक्षक गर्दी करताना दिसत होते.

परंतु पठाणच्या कमाईत सहाव्या आणि सातव्या दिवशी मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे. या चित्रपटानं सोमवारी २५.५० कोटी रूपयांची कमाई केली तर मंगळवारी त्याहून कमी म्हणजेच २१ कोटी रूपयांची कमाई केली.

पठाण चित्रपटानं आतापर्यंत देशभरातून ३१७.५० कोटी रूपयांची कमाई केली. तर जगभरातून या चित्रपटानं ६४० कोटी रूपयांचा गल्ला जमवला आहे.

दरम्यान, सहाव्या आणि सातव्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत घट झाली असली तरी कमी वेळात खूप जास्त गल्ला जमवण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला आहे. या चित्रपटानं अनेक चित्रपटांचे रेकाॅर्ड तोडले आहेत.

महत्वाच्या बातम्या-