पठाणनं कहरच केला की; केलीय तब्बल ‘इतक्या’ कोटींची कमाई

मुंबई | शाहरूख खान(Shah Rukh Khan) आणि दीपिका पादुकोन(Deepika Padukone) यांची मुख्य भूमिका असलेला ‘पठाण'(Pathaan) हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्यामुळं हा चित्रपट फार काही कमाई करू शकणार नाही, असं काहींचं मत होतं.

परंतु २५ जानेवारीला हा चित्रपट रिलीज झाला आणि सर्वच थिएटर्स हाऊसफुल्ल झाली. या चित्रपटानं अल्पावधीत रेकाॅर्डब्रेक कमाई केली होती. या चित्रपटानं अनेक चित्रपटांचे रेकाॅर्ड तोडले आहेत.

पठाणनं सोळाव्या दिवशी 5.75 कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळं पठाणच्या एकूण कमाईत दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे.

आतापर्यंत पठाणनं देशात 452 कोटींपेक्षा पेक्षा जास्त गल्ला जमवला आहे. तर जगभरात एकूण पठाणनं तब्बल 877 कोटी रूपये कमवले आहेत.

दरम्यान, पठाणचं कौतुक आता राज ठाकरेंसह पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केलं आहे. परंतु अजूनही काहींचा पठाणला विरोध कायम आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More