बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पठ्ठ्याने आयफोन 12 मागवला, Flipkart ने भलतंच काही पाठवलं, व्हिडीओ पाहून सगळेच हैराण!

नवी दिल्ली |  ग्राहकांकडून वस्तू खरेदी करण्यासाठी ऑनलाईनचा पर्याय सर्वात जास्त निवडला जात आहे. मात्र ऑनलाईन वस्तू खरेदी करताना ग्राहकांची अनेकदा फसवणूक होण्याच्या घटना घडल्या आहेत. अशातच एका व्यक्तीने Flipkart वरून iPhone 12 खरेदी केला, मात्र ज्यावेळी त्यांनी तो बॉक्स ओपन केला, तेव्हा त्याला भलतीच वस्तू मिळाली. हा सगळा प्रकार पाहून सगळेच जण हैराण झालेत.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर Flipkart वर सुरू असलेल्या Big Bilion Days सेलमधून एका व्यक्तीने iPhone 12 खरेदी केला. त्या व्यक्तीने डिलिव्हरी झालेला बॉक्स जेव्हा उघडला. तेव्हा त्याला त्या बॉक्समध्ये निरमा साबण आढळून आली. तेव्हा तिथे उपस्थित असलेले सर्व जण हा प्रकार पाहून अवाक् झालेत. त्यानंतर त्या व्यक्तीने फ्लिपकार्ट सपोर्टला फोन केला. परंतु कंपनीने वस्तू अजूनही ‘आऊट ऑफ डिलिव्हरी’ असल्याचं सांगितलं. यावेळी फ्लिपकार्टवर कॅन्सलेशन तेव्हाच करता येऊ शकतं, ज्यावेळी याचं स्टेटस एखाद्या दुसऱ्या वस्तूवर स्विच होईल. फ्लिपकार्टने पुन्हा कॉन्टॅक्ट करण्याचा दावा केला आणि त्या व्यक्तीला Flipkart Wishmasters पर्याय आला.

अनेक प्रयत्नानंतर फ्लिपकार्टने अखेऱीस त्या व्यक्तीची ऑर्डर रद्द केली आणि रिफंड सुरू केलं. त्यानंतर त्या व्यक्तीचे पैसे त्याच्या अकाउंटला जमा झाले. फ्लिपकार्टवर ‘ओपन बॉक्स डिलिव्हरी’ हा पर्याय दिल्यामुळे त्या व्यक्तीने अनबॉक्सिंग करताना व्हिडीओ काढला होता. त्यामुळे त्याला पैसे परत मिळण्यासाठी त्याचा फायदा झाला. ऑनलाईन खरेदी करताना ग्राहकांनी ओपन बॉक्स डिलव्हरी हा पर्याय निवडला तर त्याचा फायदा होऊ शकतो. हे या प्रकरणावरून सिद्ध झालं आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर प्रचंड व्हायरल झाला. त्यावर अनेकांनी फ्लिपकार्टच्या या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. तर अनेकांनी या व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स देखील केल्या.

 

थोडक्यात बातम्या-

‘मी बुधवारी आणखी एक पोलखोल करणार’,किरीट सोमय्यांचा पवारांना थेट इशारा

दिवाळीत दुचाकी घेण्याचा विचार करताय?, तर ही बातमी एकदा वाचा

‘हिंमत असेल तर एनसीबीने…’; नवाब मलिकांचं एनसीबीला खुलं आव्हान

आयकर विभागाच्या धाडीनंतर प्रथमच अजित पवारांचा बारामती दौरा, मतदारसंघातील महिला म्हणतात…

अजित पवार यांच्यावरील कारवाई योग्यच, पण…- राजू शेट्टी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More