बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Omicron Alert: जागतिक आरोग्य संघटनेनं दिला ‘हा’ गंभीर इशारा

मुंबई | कोरोना महामारीन अद्यापही आपला कहर कायम ठेवला आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं सध्या सर्वांनाच चिंतेत टाकलं आहे. ओमिक्राॅनच्या रूग्णसंख्येनं सरकार आणि आरोग्य व्यवस्थेसमोर नवं आव्हान उभं टाकलं आहे. दक्षिण आफ्रिकेपासून हा ओमिक्राॅनचा धोका सुरू झाला होता. आता तो राज्यात पसरत असल्याचं पहायला मिळत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनं सर्वांना ओमिक्राॅनच्या धोक्याबाबत सतर्क राहाण्याच्या सुचना केल्या आहेत. ओमिक्राॅन हा डेल्टापेक्षाही अधिक वेगानं पसरत आहे. परिणामी रूग्णलयांनी तयार राहण्याची गरज आरोग्य संघटनेनं बोलून दाखवली आहे. हा व्हेरियंटनं किती मृत्यू होतील आणि हा किती धोकादायक आहे, ते आत्ताच आम्हाला सांगता येणार नाही, असं आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.

ओमिक्राॅन रूग्णाचा पहिला मृत्यू ब्रिटनमध्ये झाला आहे. जगातील ओमिक्राॅननं मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. जागतिक स्तरावर रूग्णसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यानं रूग्णालयांनी सतर्क राहायला हवं. जेणेकरून ऐनवेळी सर्वत्र कोरोनासारखी परिस्थिती उद्भवनार नाही. परिणामी सध्या सर्व जगामध्ये आपापल्या देशातील रूग्णालयांची परिस्थिती सुधारण्यावर भर देण्यात येत आहे.

दरम्यान, सध्या हा नवा व्हेरियंट जगातील 60 पेक्षा अधिक देशांमध्ये पसरला आहे. इंग्लंडमध्ये रूग्णाचा मृत्यू झाल्यापासून इंग्लड सरकारनं नागरिकांना ओमिक्राॅनला हलक्यात न घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. कोरोनाच्यावेळी जगभरात रूग्णालयाची अवस्था फार बिकट झाली होती हे विशेष आहे.

थोडक्यात बातम्या 

15 विद्यार्थी Corona Positive सापडल्यानं खळबळ, विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णय

Share Market: लाखाचे केले 5 कोटी!; ‘या’ शेअरनं करुन दिली छप्परफाड कमाई

राहुल गांधींच्या सभेवरून आघाडीत रंगलाय कलगीतुरा?, पण भाई जगताप म्हणतात…

जॉन अब्राहमने उचललं धक्कादायक पाऊल?, चाहतेही झालेत हैराण

तुम्ही संभाजीनगर म्हणा, तुम्हाला न्यायालयात उभा करतो – गुणरत्न सदावर्ते

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More