बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सावधान! कोरोनामधून बरे झालेल्या लोकांमध्ये ‘या’ आजाराचा धोका वाढतोय

नवी दिल्ली | देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना सध्या तिसऱ्या लाटेचा धोका संभवत आहे. यासाठी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार महत्त्वाची पावलं उचलत आहेत. अशातच आता कोरोनातून बरे झाल्यानंतर पाच लोकांना पित्ताशयामध्ये गॅंगरिनच्या समस्येचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे देशात आणखी चिंता वाढली आहे.

जून ते ऑगस्ट यादरम्यान कोरोनामधून बरे झाल्यानंतर रूग्णांच्या पित्ताशयात गंभीर सूज आली होती. ज्यामुळे पित्ताशयात गॅंगरिनची समस्या निर्माण झाली. त्यांच्यावर लवकरात लवकर शस्त्रक्रिया करणे गरजेचं होतं. या रूग्णांवर आम्ही सर गंगाराम रूग्णालयात यशस्वी उपचार केले आहेत, असं इन्स्टिट्युड ऑफ लिव्हर आणि गॅस्टोएन्टेरोलॉजी आणि पॅन्क्रेटीकोबिलरी सायन्सचे अध्यक्ष डॉ. अनिल अरोरा यांनी सांगितलं आहे.

पित्ताशयामध्ये गॅंगरिनची प्रकरणे नोंदवण्याची देशात ही पहिलीच वेळ आहे. पाच रूग्णांपैकी चार पुरूष आणि एक महिला आहे. ज्यांचे वय 37 ते 75 या दरम्यान आहे. गॅंगरिनच्या आजारामुळे शरीराच्या काही भागातील ऊती नष्ट होऊ लागतात. ज्यामुळे त्या जखमा सर्व शरीरभर पसरतात. त्याचबरोबर कोरोना साथीची लक्षणे आणि पित्ताशयातील गॅंगरिन रोग शोधण्याच्या कालावधीमध्ये दोन महिन्यांचे अंतर होते, असंही अनिल अरोरा म्हणाले.

दरम्यान,  सर्व रूग्णांनी ताप, ओटीपोटावरील उजव्या बाजूला वेदना त्याचबरोबर उलट्या केल्याची तक्रार केली होती. या 2 रूग्णांना मधूमेह आणि एकाला ह्दयरोग होता. या रूग्णांची कोरोनाच्या उपचारामध्ये स्टेरॉईट घेतल्याचा दावाही अनिल अरोरा यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

रावसाहेब दानवे यांना शिवसेनेत यायचं असेल तर…- छगन भुजबळ…अन् पुण्यातल्या पठ्ठ्यानं उभारलं चक्क गाडीचं स्मारक, पाहा व्हिडीओ!

“संजय राऊतांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पाठवणार, असं मला कळतंय”

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत आणखी वाढ!

रेल्वे रुळ सोडून आमच्या स्टेशनवर येऊ शकता- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More