बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘राष्ट्रवादी हा कधीच भरवशाचा पक्ष नाही’; चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीवर प्रहार

सोलापूर | सर्व मागण्या मान्य न झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन अधिक तीव्र केले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोलापूरमध्ये जाऊन या एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सणकून टीका केली आहे. राष्ट्रवादीसोबत सलगी करण्याबद्दल बोलताना “राष्ट्रवादी हा भरवशाचा पक्ष नाही” अशी जहरी टीका त्यांनी केली आहे.

ते म्हणाले, “राष्ट्रवादी हा कधीच भरवशाचा पक्ष नाही. सकाळी एक राजकारण, दुपारी एक राजकारण आणि संध्याकाळी. एकवेळी काँग्रेस परवडली. काँग्रेसमधील सर्व वेल कल्चर्ड आहेत. दरोडेखोर नसतात. राष्ट्रवादीच्या सलगी करण्याच्या भुलीला भाजप कधीच भूलणार नाही.” राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सांगलीत भाजपसोबत सलगी करत असल्याच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील बोलत होते.

याशिवाय पुढे ते म्हणाले, राष्ट्रवादी जवळ येेऊ पाहतोय पण आम्ही त्यांना जवळ येऊ देणार नाही. शिवाय राष्ट्रवादीच्या डावाला भाजप कधीच भूलणार नाही” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य झाल्या असून काही मागण्या अजूनही मान्य झालेल्या नाहीत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात गुरूवारी एक बैठक पार पडली होती. या बैठकीत तोडगा निघेल, असं वाटलं होतं. मात्र तरीही एसटी कर्मचाऱ्यांनी कृती समिती शासनासोबत डिल करतेय, असा आरोप करून संप सुरूच ठेवला आहे. नुकताच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता आणि घरभाडे भत्त्यातही वाढ करण्यात आली आहे. मात्र तरीही एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवलं आहे.

थोडक्यात बातम्या-

समीर वानखेडेंच्या ‘त्या’ दाढीवाल्या मित्राचा नवाब मलिकांनी केला खुलासा

‘5 किलो लाडूची सोय करा’ म्हणत लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याचा भांडाफोड

समीर वानखेडेंना दिलासा मिळाला असला तरी अटकेची टांगती तलवार कायम

आता कोरोनावर मात करण्यासाठी ‘या’ कॅप्सुलनं होणार उपचार

देशातील कोरोना रूग्णसंख्येत घट पण मृतांच्या आकड्यात वाढ, वाचा आकडेवारी

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More