बीड | मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा समाज आता आणखी आक्रमक झाला आहे. पाटोद्यात तर चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक दहावा घालण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांचा दहावा घालून मराठा समाजाने सरकारचा निषेध केला. मुख्यमंत्र्यांच्या फोटोला हार घालून मराठा तरुणांनी यावेळी मुंडन देखील केलं. यावेळी शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा दिला.
दरम्यान, मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावे, अन्यथा गंभीर परिणामांना तयार रहावे, अशा इशारा आता मराठा समाजाकडून सरकारला दिला जातोय.
महत्त्वाच्या बातम्या–
-आरजे मलिष्काला राधाकृष्ण विखे-पाटलांनी दिला ‘हा’ सल्ला
-कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल
-अटल बिहारी वाजपेयींच्या सुरक्षतेत मोठा हलगर्जीपणा
-राहुल गांधींनी मोदींना मारलेल्या मिठीवरून राज ठाकरेंचा मोदींना सवाल
-भाषणात शरद पवारांचं नाव घेतल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रोल