बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर ते पाठीत खंजीर खुपसल्यासारखं होईल’; पवारांच्या निवडणूक एकत्र लढण्याच्या वक्तव्यावर पटोलेंचं मोठं वक्तव्य

मुंबई | विधानसभा आणि लोकसभा निवडणुका शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार शरद पवार यांनी म्हटलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलत होते. मात्र काँग्रेस पक्षाने आपला स्वबळाचा नारा कायम ठेवत सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आम्ही आधीपासूनच आगामी निवडणुकांबद्दलचं आमचं धोरण जाहीर केलं आहे. समजा आम्ही सोबत आहोत असं म्हटलं आणि ऐन निवडणुकांच्या वेळी स्वतंत्र लढणार असं सांगितलं,तर ते पाठित खंजीर खुपसल्यासारखं होईल. त्यामुळे आजपासूनच आम्ही म्हणतोय, आम्ही स्वतंत्रच लढणार आहोत, असं नाना पटोले म्हणाले.

आम्ही आजपासूनच जाहीर करतोय. आम्ही स्वतंत्रच लढणार आहोत. त्यामुळे आम्ही आमची तयारी सुरू केली आहे. मित्रपक्षांना देखील आमचा संदेश आहे की तुम्हीही तयारी सुरू करा, असंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे. नानांनी प्रशांत किशोर यांनी दोन वेळा सांगितलय की, राहुल गांधी पंतप्रधान होणार असल्याचं सांगितलं.

दरम्यान, पवारांच्या निवडणुक एकत्र लढण्याच्या वक्तव्यावरून भाजप नेते नारायण राणेंनी टोला हाणला होता. शरद पवार जेव्हा एखादी गोष्ट सांगतात, तेव्हा त्याचा उलटअर्थी अर्थ लावायचा असतो. ही त्यांनी काँग्रेसला दिलेली धमकी आहे. जरी शरद पवार तसं म्हणाले असले, तरी शरद पवार साहेब कधीही शिवसेनेसोबत निवडणूक लढवणार नाहीत, असं नारायण राणे यांनी म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या- 

ब्लॅक फंगसच्या औषधावर आणि कोरोना लसीवर GST लागणार का? अर्थमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा

“सोनिया गांधींची गुलामगिरी करत सत्तेचं लोणी खाणं बरं वाटतं का?”

“काँग्रेस नेते राहुल गांधीच पंतप्रधान होणार आहेत”

वारकऱ्यांच्या केसाला धक्का लागला तर गाठ आमच्याशी आहे- तुषार भोसले

‘नागिन’ फेम ‘या’ अभिनेत्रीनं सोडला अभिनय; केला ‘हा’ मोठा खुलासा

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More