Pavel Durov | सोशल मीडिया ॲप टेलिग्रामचे संस्थापक आणि सीईओ पावेल दुरोव यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. पावेल यांनी त्यांचे 12 देशांमध्ये 100 पेक्षा जास्त मुले असल्याचा दावा केला आहे. या (Pavel Durov) दाव्यानंतर जगभर याची चर्चा रंगली आहे.
सोशल मीडियावर हे कसं काय शक्य?, असे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. याबाबत पावेल यांनी स्वतः मोठा खुलासा केला आहे. पावेल हे गेल्या 15 वर्षांपासून मुल बाळ होत नसलेल्या जोडप्यांना शुक्राणू (स्पर्म ) दान करत आहेत. अगोदर सर्वांनाच हे पागलपण वाटलं, पण नंतर त्यांच्या सोबत घडलेल्या एका घटनेने त्यांचे संपूर्ण विचार बदलून गेले.
पावेल दुरोव यांचा धक्कादायक खुलासा
पावेल दुरोव (Pavel Durov) यांनी सांगितलं की, 12 देशांमध्ये त्यांची 100 हून अधिक मुले आहेत. ही सर्व मुले त्यांनी दान केलेल्या स्पर्ममधून जन्माला आली असल्याचा धक्कादायक खुलासा त्यांनी केला आहे. 15 वर्षांपुर्वी त्यांच्या मित्राने एक विचित्र मागणी केली. पॉवेलच्या मते, त्याच्या मित्राला मुले होत नव्हती. त्यामुळे पती-पत्नी दोघेही त्याच्याकडे आले आणि त्यांना मदत करण्याची विनंती केली.
त्याच्या मित्राने खूप विनंती केल्यानंतर, पावेल हे स्पर्म दान करण्यास तयार झाले. यानंतर त्यांचा मित्र व त्याची पत्नी एका निरोगी मुलाचे पालक बनले. मित्राने विनंती केल्यानंतर मला त्यांनी एका क्लिनिकमध्ये स्पर्म दान करण्यास सांगितले, जेणेकरुन टेस्टट्यूब बेबी द्वारे त्यांना मूल होईल, असा खुलासा पावेल यांनी केला आहे.
12 देशात 100 हून अधिक मुले
पावेल (Pavel Durov) यांनी सांगितले की, इथूनच त्यांचा स्पर्म डोनेट करण्याचा प्रवास सुरू झाला.अशात त्यांना नुकतेच कळले की, त्यांना 100 मुले आहेत. पावेल यांनी लग्न केले नाही व त्यांना नेहमीच एकटे राहणे आवडते असे देखील ते म्हणाले. सध्या त्यांचं हे विधान आता चर्चेत आलं आहे.
News Title- Pavel Durov revealed that he has 100 children
महत्वाच्या बातम्या-
पती अभिषेकला सोडून ऐश्वर्या राय पोहोचली परदेशी, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत मोठा बदल; जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनदर
“तुला तुडवणारच, कुत्र्यासारखं मारणार”; मनसे नेत्याने काढली अमोल मिटकरींची लायकी
“राहुल गांधी ड्रग्ज घेतात, त्यांची चाचणी…”; कंगना रनौतचं मोठं वक्तव्य
“आपल्या देशात सेक्सला खूपच कमी महत्व दिलं जातं”; सई ताम्हणकरचं वक्तव्य चर्चेत