बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पवारसाहेब जाणते राजे, मुंबई पोलिसांची नाचक्की करणाऱ्या गृहमंत्र्यांना हटवा- प्रसाद लाड

मुंबई | सचिन वाझे प्रकरणातील जी मोठी नावं बाहेर येत आहेत, किंवा येतील, त्यातून मुंबई पोलिसांची होणारी नाचक्की खेदजनक आहे. अशा लोकांना पाठीशी घालणे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारुन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जाणते राजे आहेत, मुंबई पोलिसांची नाचक्की करणाऱ्या गृहमंत्र्यांना पदावरुन हटवावं, अशी मागणी भाजप नेते प्रसाद लाड यांनी केली आहे.

अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतल्याशिवाय या प्रकरणाचा छडा लागणार नाही. शरद पवार महाराष्ट्राचे जाणते राजे मानले जातात. त्यांच्या पक्षाचा गृहमंत्री गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाला पाठीशी घालत असेल. तर ही खेदजनक गोष्ट आहे. गृहमंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे. किंवा नैतिक जबाबदारी स्वीकारुन त्यांनी स्वतः राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी प्रसाद लाड यांनी यावेळी केली.

सचिन वाझे प्रकरणात रोज नवनवीन उलगडे होत आहेत. स्काॅर्पिओ किंवा इनोव्हा कार असो, आणखी पोलिस अधिकाऱ्यांची नावं असो. यामध्ये मुंबई पोलिसांची नाच्चकी केली गेली, त्याला कारण कोण आहे. त्याला पाठीशी घालणारे गृहमंत्री अनिल देशमूख यांचा राजीनामा घ्या. अशी मागणी मी वारंवार विधापरिषदेत करत होेतो, असंही लाड म्हणाले.

दरम्यान, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या सचिन वाझे यांचे पोलीस दलातून निलंबन करण्यात आले आहे. यामुळे वाझेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सचिन वाझे हे सध्या राष्ट्रीय तपासयंत्रणेच्या कोठडीत आहेत. त्यांना शनिवारी रात्री अटक करण्यात आली होती. यानंतर रविवारी विशेष न्यायालयात हजर करून NIA ने 25 मार्चपर्यंत त्यांचा रिमांड मिळवला.

थोडक्यात बातम्या –

सचिन वाझेंची प्रकृती खालावली; उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात हलवलं

रेल्वेच्या पुलावर मुलं उभी होती, तेवढ्यात अचानक मालगाडी आली अन्…. पाहा व्हिडिओ!

गंगुबाईच्या लुकनंतर आलियाचा ‘हा’ लुक होतोय प्रचंड व्हायरल; पाहा आलियाचा नवीन लुक

महागाईचा कहर! आता खाद्यतेलाच्या किंमती तब्बल ‘इतक्या’ टक्यांनी वाढल्या

भाजपच्या या आमदाराने योगी आदित्यनाथांसोबत केली छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना; म्हणाले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More