बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मी मोठी नेता नसल्याचं पवारसाहेब म्हणाले असतील पण मी…’; पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर

मुंबई | भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भगवान गडावर नुकताच दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी चौफेर फटकेबाजी केली. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना शनिवारी पत्रकार पारिषदेत प्रश्न विचारला असता पवारांनी पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर भाष्य करणं टाळलं. तसेच त्यांच्या वक्तव्यावर मी बोलावं एवढया त्या मोठ्या नेत्या नसल्याचं म्हटलं.

यानंतर आज पंकजा मुंडे दिल्लीला एका बैठकीसाठी निघाल्या असता मुंबई विमानतळावर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पंकजा मुंडे यांना शरद पवारांच्या वक्तव्यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्यांच्या बोलण्याने आपण लहान किंवा मोठे होत नसल्याची प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी दिली आहे.

यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी पवार साहेबांचं वक्तव्य मोबाईलवर पाहिलं. मी मोठी नेता नाही, हे त्यांचं वक्तव्य बरोबर आहे. मी एक लहानच नेता आहे. परंतु मोठ्या नेत्यांनी लहान नेत्यांविषयी बोललं पाहिजे. त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यांना शिकवलं पाहिजे.

तरी देखील पवार साहेब मला असं म्हणाले असतील तर मी त्यांच्या बोलण्याने लहान होत नाही आणि मोठीही होत नाही. मी आहे तेवढीच राहणार आहे. पवारसाहेब आमच्यापेक्षा नक्कीच मोठे आहेत त्यात काही वाद नाही, असं देखील पंकजा मुंडे यांनी यावेळी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या

सुजय विखे अन् पार्थ पवार यांचा एकत्र विमान प्रवास, फोटो शेअर करत सुजय विखे म्हणाले…

‘या’ अटीवरच ईडीने महाराष्ट्रात यावं, नाहीतर येऊ नका – उदयनराजे भोसले

“फडणवीसांच्या काळात कुणी काय केलं ते लवकरच बाहेर काढणार”

…म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने चंद्रकांत पाटलांना दिली ‘नवरत्न तेलाची बाटली’ गिफ्ट!

“दलित आणि मुस्लिमांची नावे मतदार याद्यांतून गहाळ करण्यात आली आहेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More