Top News

पवार साहेब, मी तुम्हाला शब्द देतो की…- एकनाथ खडसे

मुंबई | शरद पवार साहेब, मी तुम्हाला शब्द देतो की मी गेली 40 वर्षे ज्या निष्ठेने भाजपचं काम केलं, त्याच निष्ठेने मी यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करेन. मी भाजप पक्ष वाढवला, तसाच आता राष्ट्रवादी पक्ष दुप्पट वेगाने वाढवे, असं एकनाथ खडसेंनी म्हटलंय.

मी पक्षाचा विस्तार करून दाखवेन. मला फक्त तुम्हा लोकांची साथ हवी आहे. माझ्या पाठीशी जर कोणी भक्कमपणे उभं राहिलं, तर मी कुणालाही घाबरत नाही, असंही खडसे यावेळी म्हणाले.

तोंडावर गोड बोलायचं, तुम्ही ज्येष्ठ म्हणायचं आणि मागून खंजीर खुपसायचा हे मी कधीही केलं नाही. 40 वर्षे मी भाजपची सेवा केली, त्याबदल्यात मला काय पक्षाने दिलं?, असा सवाल खडसेंनी केलाय.

दरम्यान, मी पक्ष सोडावा अशी कार्यकर्त्यांची भावना होती. कारण पाठीमागून कारवाया करत राहाणं हे माझ्या तत्वात कधीच बसलं नाही, असं म्हणत खडसेंनी फडणवीसांवर निशाणा साधलाय.

महत्वाच्या बातम्या-

भाजपसाठी जितक्या निष्ठेने काम केलं, तितकंच राष्ट्रवादीसाठी करेन- एकनाथ खडसे

IPL2020- आज मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज; चेन्नईसाठी ‘करो या मरो’ची लढाई

‘काना मागून आला आणि तिखट झाला’; नाव न घेता जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला

शरद पवारांच्या उपस्थित एकनाथ खडसेंचा अखेर राष्ट्रवादीत प्रवेश!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या