बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पवार साहेब, शेतकरी विरोधात काम करणाऱ्या मंत्र्यांना हटवा, वेळ मिळाल्यास आमच्याकडेही लक्ष द्या”

जळगाव | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांना जाणता राजा म्हटले जाते, शेतकऱ्यांसाठी दिवस-रात्र झटणारा एकमेव नेता म्हणूनही शरद पवार यांचा देशात नावलौकिक आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही स्थानिक नेतेमंडळीची शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण राबवत नाहीये. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यात चालढकलपणा करत असल्याची तक्रार एका शेतकऱ्याने आणि जळगाव जागृत जनमंचचे पदाधिकारी शिवराम पाटील यांनी आपल्या पत्राद्वारे केली आहे.

भ्रष्ट व लाचखोर मंत्री बाळगल्याने राष्ट्रवादीची प्रतिमा मलिन होत आहे. वाझे, ठाकरे, देशमुख आणि परमबीरसींग या घृणास्पद विषयातून वेळ मिळाला तर शेतकरी हिताकडे लक्ष द्यावे. सत्तेवर आला आहात तर त्याचा आम्हा शेतकऱ्यांना काय उपयोग?, असा पोटतिडकीने सवाल शिवराम पाटील यांनी केला आहे.

शरद पवार यांना पत्र लिहून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची होत असलेली पिळवणूकच त्यांनी आपल्या पत्रात मांडली आहे. विशेष म्हणजे ही पिळवणूक करण्यास राष्ट्रवादीचे नेते, मंत्रीच जबाबदार असल्याचं सांगताना मंत्री महोदयांना अधिकाऱ्यांकडून हफ्ता जातो की काय, असा सवालही त्यांनी विचारला आहे. तसेच, या मंत्र्यांना पदावरुन हटविण्याची मागणीही शिवराम पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आमदार अनिल भाईदास पाटील आणि अमळनेर बाजार समितीच्या प्रशासक श्रीमती तिलोत्तमा पाटील यांनी शेतकऱ्यांना अनुदान मिळू देण्यात विरोध केला आहे. यासंदर्भात जळगाव लोकसभा उमेदवार तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादीचे माजी खासदार ईश्वरलाल जैन, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले. विषयही समजावून सांगितला, पण ते शेतकरी हिताच्या मानसिकतेत आढळून आले नाहीत, असा आरोपही पाटील यांनी आपल्या पत्रात केला आहे.

थोडक्यात बातम्या –

31 मार्चपर्यंत करून घ्या ‘हे’ महत्वाचं काम अन्यथा तुमचं पॅनकार्ड होऊ शकतं रद्द!

‘मी मोठा भाऊ आहे, हात उचलला म्हणजे…’; त्या व्हायरल व्हिडीओवर बाबुल सुप्रियोंचं स्पष्टीकरण

‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप’च्या फायनलवर कोरोनाचं सावट; गोलंदाजांना फटका बसण्याची शक्यता

सचिन वाझेंची तब्येत पुन्हा बिघडली; उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात हलवलं

धक्कादायक! तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या तरूणालाच पोलिसांनी केली मारहाण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More