“चाटायचं असेल तेव्हा पवारसाहेब आणि चावायचं असेल तेव्हा…”
मुंबई | शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेत खासदार संजय राऊत यांनी भाजपवर काही गंभीर आरोप केले आहेत. ईडी, सीबीआय अशा केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
‘चाटायचं असेल तेव्हा पवार साहेब, चावायचं असेल तेव्हा बाळासाहेब याला म्हणतात, लोंबत्या राऊत’, अशी घणाघाती टीका नितेश राणे यांनी केली आहे. तसेच मराठी कट्या संदर्भात देखील नितेश राणे यांनी ट्विट केलं आहे. हो मराठी कट्टा सुरू केला भाजपने, आम्ही पुन्हा येतो आहोत मराठी माणूस जागवण्यासाठी, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. तसेच भेटू मग असं म्हणत एक इमोजी टाकला आहे.
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी मला धमक्या येत असल्याचं सांगितलं आहे. कितीही आमच्या पाठीवर वार केले तरी शिवसेना घाबरणार नाही. गेल्या काही दिवसांपासून आपण पाहता की, शिवसेना असेल ठाकरे परिवार असतील. अगदी पवार साहेबांच्या कुटूंबापासून सगळ्यांवर केंद्रीय तपास यंत्रणा हल्ले करत आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यात कमालीचा संघर्ष वाढला आहे. त्यातच केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत शिवसेनेच्या नेत्यांना त्रास दिला जात आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेवरून नितेश राणे यांनी घणाघाती टीका केली आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना प्रमुख दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांच नावदेखील घेतलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“पुन्हा येताना ते व्हिडीओ घेऊन येणार???”, पत्रकार परिषद संपताना राऊतांचा गौप्यस्फोट
“मुलुंडचा दलाल”; संजय राऊतांकडून किरीट सोमय्यांचा असा उल्लेख
“तो जो कोण बोलतोय दलाल, ज्याला मराठीत भडवा म्हणतात”
“मला ती लोकं म्हणाली, केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाईट करतील”
“महाराष्ट्र गांडूची औलाद नाही आणि शिवसेना अजिबात घाबरणार नाही”
Comments are closed.