बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पवार साहेब तुमचे डायरेक्ट दाऊदसोबत संबंध नाहीत ना?”

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना मनीलाँड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली होती. नवाब मलिकांनी  मनीलाँड्रींगच्या गुन्हात सहभाग घेतला, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. न्यायालयाच्या निरिक्षणानंतर विरोधकांनी महाविकास आघाडी सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. अशातच आता भाजप नेते निलेश राणे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

पवार साहेब तुमचे डायरेक्ट दाऊदसोबत संबंध नाहीत ना?, नवाब मलिक मधला असू शकतो, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे. राजकारणात जेव्हापासून आलो तेव्हापासूनच हा संशय आहे. मुंबई बॉम्ब ब्लास्ट घटनेपासून तुम्ही एक वाढीव बॉम्ब ब्लास्ट जाहीर केला तो नेमका कोणाला वाचवण्यासाठी होता?, असे सवालही निलेश राणे यांनी केले आहेत.

दाऊद आणि नवाब मलिक दोघांचे संबंध आहेत हे संबंधित कोर्टाचं निरीक्षण, असे निलेश राणे यांनी म्हटलं आहे. नवाब मलिकवर केलेले आरोप खरे ठरले, आतातरी बारामतीचे नेते नवाब मलिकचा राजीनामा घेणार?, असाही सवाल निलेश राणे यांनी केला आहे.

दरम्यान, न्यायालयाने डी गँगशी संबंध आहे, असं निरिक्षण नोंदवलं आहे. न्यायालयाच्या निरिक्षणानंतर विरोधकांनी  नवाब मलिकांचा राजीनामा का घेतला जात नाही?, असा सवाल केला होता. नवाब मलिक हे हसीना पारकर, सलीम पटेल आणि सरदार शहावली खानच्या संपर्कामध्ये होते, असे आरोप करण्यात आलेले आहेत.

थोडक्यात बातम्या- 

‘मी काय कांड करणार?, मला कांड करायचा असता तर…’; सभेआधी वसंत मोरे संतापले

माझे जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी; आषाढी वारीची जोरदार तयारी सुरू

‘माझ्यासोबत सेक्स केला तर…’; एलोन मस्कवर एअर होस्टेसने केला होता गंभीर ऑफर

तीन महिन्यापूर्वी सैन्यात भरती झालेल्या 22 वर्षीय प्रथमेश पवार यांना जम्मूत वीरमरण!

“हे सरकार बेईमान औलादीचं, यांना समुद्रात बुडवलं पाहिजे…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More