बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून शिवराज सिंह चौहानांना ‘पावरी हो रही है’ चा मोह आवरला नाही

भोपाळ | ‘पावरी हो रही है’ हे वाक्य एव्हाना सर्वांच्या परिचयाचं झालं असावं. सोशल मीडियावर जिकडे बघेल तिकडे लोक पावरी हो रही है या विनोदी गाण्यावर व्हिडीओ बनवून व्हायरल करताना दिसले. अनेक सेलिब्रिटींनीही या ट्रेंडवर भन्नाट व्हिडीओ बनवून आपल्या फॅन्सची मनं जिंकून घेतली. मात्र आता चक्क मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानही या ट्रेंडमध्ये सहभागी झाले आहेत.

भू माफियांना जरब बसावा यासाठी शिवराज यांनी या ट्रेंडचा वापर केला आहे. हा मी आहे,  ‘हे माझं सरकार आहे,  ही माझी प्रशासकीय यंत्रणा आहे  अन् बघा भू-माफिया पळत आहेत’, असं म्हणत शिवराज यांनी उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या. शिवराज यांचा पावरी हो रही है स्टाईल व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

भू माफियांना सज्जड दम भरताना शिवराज म्हणाले की, राज्याच्या जनतेवर कुणी अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर त्याची हयगय केेली जाणार नाही. तसेच टायगर अभी जिंदा है अस म्हणत हा वाघ चिटफंड दलाल, भू माफिया इ. जीवन उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही यावेळेस दिला.

दरम्यान दनानिप बुनिनचा पाकिस्तानी तरुणीचा पावरी हो रही है हा व्हिडीओ चांगलाच लोकप्रिय झाला होता. यशराज मुखटे नामक युट्युबरने या व्हिडीओवर विनोदी पद्धतीनं गाणं बनवल्यावर भारतातही हा व्हि़डीओ काही दिवस ट्रेंडिंगमध्ये राहिला होता.

थोडक्यात बातम्या-

‘नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50 हजार रुपयांची मदत करणार पण…’; अजित पवारांची मोठी घोषणा

“तुम्हारा सिर्फ तीन महिने का वक्त रहा है, हमारा दौर फिर से आयेगा”

“…ते दृश्य पाहून रात्रभर झोपू शकलो नाही”, भर सभागृहात मुख्यमंत्र्याना अश्रू अनावर, पाहा व्हिडीओ

रोहित पवारांच्या त्या ट्विटला अमृता फडणवीसांचा प्रतिसाद; म्हणाल्या…

‘अशावेळी आर. आर. पाटील असते तर…’; मनसुख हिरेन प्रकरणावर मनसेची प्रतिक्रिया

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More