पुणे | आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार कुटुंबियांना लक्ष्य केल्याचं दिसतंय. पुण्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात भाष्य केलं.
काहींना या निवडणुकीत मुला-बाळांना स्थिरस्थावर करायचं आहे, अशा शब्दात त्यांनी पवार कुटुंबातील घराणेशाहीवर नाव न घेता भाष्य केलं आहे.
पवार कुटुंबातील सुप्रिया सुळे बारामतीतून लढतील. तर शरद पवार माढ्यातून लढणार असल्याचं कळतंय. याशिवाय पवारांचे नातू पार्थ पवार यांची मावळ तर दुसरे नातू रोहित पवार यांची शिरुर लोकसभा मतदारसंघातून नावं चर्चेत आहेत.
दरम्यान, माढ्यातून लढू नका नाहीतर पराभूत व्हाल, असा सल्ला नुकताच चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना दिला आहे, त्यामुळे भाजपने पवारांना लक्ष्य केल्याचं चित्र आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“राज ठाकरेे काही प्रश्नावर आमच्या सोबत मात्र आगामी निवडणुकीत….”!
–“काहीही सांगा पण किरीट सोमय्यांचं काम करायला सांगू नका”
-“भाजप नेत्यांनो माझ्या तब्येतीची काळजी करू”, शरद पवार माढा लोकसभा लढणार?
–पुण्यातून भाजपनं पक्क ठरवलं ‘एकला चलो रे’? पुण्याच्या सभेत युतीबाबत एक शब्द नाही!
–दिल्लीतील परिस्थिती पाहता पवारांना पंतप्रधान बनण्याची संधी- मोहिते पाटील