पहाटेचा शपथविधी ही एक खेळी होती?; शरद पवारांच्या वक्तव्याने खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार नाना काटे (Nana Kate) यांच्या प्रचारार्थ संस्कृती लॉन्स, सांगवी इथे प्रचार सभा झाली. यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना शरद पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) पहाटेच्या शपथविधीबाबत केलेल्या वक्तव्यावर देखील भाष्य केलं.

पहाटेच्या शपथविधीतून सरकार बनविण्याचा प्रयत्न झाला खरा. पण त्यातून एक फायदा झाला. तो म्हणजे राज्यातील राष्ट्रपती राजवट उठली, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं आहे.

शरद पवारांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. या शपथविधीमागे पवारच होते का? अशी चर्चाही या निमित्ताने रंगली आहे.

राज्यातील प्रत्येक गोष्टीला शरद पवार (Sharada Pawar) यांनाच जबाबदार धरलं जातं. त्यावरही त्यांना विचारण्यात आलं असता पवारांनी मिश्किल उत्तर दिलं. महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्ये आहे. काही झालं तरी एकाच व्यक्तीचं नाव येतं. मग राजकारणात भूकंप झाला तरी तेच नाव येतं, असा चिमटा शरद पवार यांनी काढला.

दरम्यान, यावेळी निवडणूक आयोगाचा निर्णय आणि शिवसेना यावरही त्यांनी भाष्य केलं. राजकारणात संघर्ष असतो. मात्र, सत्तेचा गैरवापर करून अधिकार हिसकावून घेणं हे या देशात कधीच घडलं नव्हतं. इथं पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह दुसऱ्याला देण्याचं काम निवडणूक आयोगाने केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-