बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“काँग्रेसच्या माडीला पवारांचा टेकू”; दानवेंनी उडवली बाळासाहेब थोरातांची खिल्ली

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये आरोप- प्रत्यारोप होताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखतीत काँग्रेसच्या पक्षनेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी शरद पवारांना सल्ला दिला होता. त्यावरून आता रावसाहेब दानवे यांनी बाळासाहेब थोरात यांची खिल्ली उडवली आहे.

शरद पवार गेली अनेक वर्ष काँग्रेसच्या हवेलीत राहिले आहेत. मात्र ही माडी आता मोडकळीस आल्याचं कळताच त्यांनी माडी सोडली. पवारांनी राष्ट्रवादीच्या रूपात नवी माडी बांधली. आता पवारांनी काँग्रेसच्या माडीला टेकू दिला आहे, असं रावसाहेब दानवे म्हणाले.

तुमची माडी कधीही पडू शकते, हे शरद पवारांनी दाखवून दिलंय, असंही रावसाहेब दानवे म्हणाले आहेत. तर बाळासाहेब थोरातांची ऑफर ही हस्यास्पद असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून देखील ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, केंद्राने राज्यांना अधिकार आरक्षणाचा अधिकार दिला आहे. भाजप आधीपासून आरक्षित असलेल्या जागेवर ओबीसी उमेदवार देणार असल्याचं रावासाहेब दानवे यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

करुणा शर्मांना मोठा झटका, कोठडीतील मुक्काम 18 सप्टेंबरपर्यंत वाढला

कोरोनाची तिसरी लाट कधी येणार?, शास्त्रज्ञांनी दिली धक्कादायक माहिती

…तेव्हा मला काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची ऑफर आली होती- नितीन गडकरी

प्रविण दरेकरांच्या अडचणी वाढल्या?, गुन्हा दाखल होण्याची शक्यता

बिहारच्या राजकारणात खळबळ! ‘या’ बड्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More