‘राज्यपालांची हकालपट्टी केली नाहीतर…’; शरद पवारांचा मोदींना इशारा
मुंबई | महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) आज मुंबईत महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला संबोधित करताना राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर टीका केली आहे. तसेच यावेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकारला देखील इशारा दिला आहे.
मी लोकशाही मार्गाने सांगतो. लोक शांत आहेत. राज्यपालांची हकालपट्टी केली नाहीतर महाराष्ट्र पेटून उठेल, अशा इशारा शरद पवार यांनी दिला आहे.
आजचे राज्यपाल सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्याबद्दल बाष्कळ विधान करतात. त्यांना शरम वाटली पाहिजे. महात्मा फुले यांनी आधुनिक विचार दिला. सामान्य माणूस, शेतकऱ्यांसाठी काम केलं. थोर नेते आणि समाजसुधारक म्हणून फुले यांचं नाव आहे, असं ते म्हणाले.
हाराष्ट्रातील काही सन्मान चिन्हं आहेत. फुले, शाहू, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील हे सन्मानीय स्थानं आहेत. त्यांच्याबद्दल काहीही बोलतात. राज्यात असा राज्यपाल पाहिला नाही, असंही ते म्हणालेत.
शंकरदयाळ शर्मांपासून अनेक राज्यपाल पाहिले. या राज्यपालांनी महाराष्ट्राचा नावलौकीक वाढवला. पण आजचे राज्यपाल महाराष्ट्राच्या विचारधारेला संकटात नेत आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.