290 रुपये द्या आणि कामावर जाण्याचं नाटक करा; कंपन्या देतायेत ऑफर

Employed

Employed l चीनमध्ये (China) बेरोजगारीचे (Unemployment) प्रमाण वाढल्याने, त्याचा परिणाम अनेक कुटुंबांवर आणि नातेसंबंधांवर होत आहे. या समस्येवर तोडगा म्हणून चीनमधील (China) काही कंपन्यांनी आणि बेरोजगार तरुणांनी एक अनोखी शक्कल लढवली आहे.

‘नोकरीत’ (Employed) असल्याचा बनाव करण्यासाठी पैसे खर्च :

चीनमधील (China) तरुण चक्क ‘नोकरीत’ (Employed) असल्याचा बनाव करण्यासाठी पैसे खर्च करत आहेत. अनेक कंपन्या बेरोजगार (Unemployed) लोकांना त्यांच्या कुटुंबापासून आणि मित्रांपासून त्यांची बेरोजगारी (Unemployment) लपवण्यासाठी मदत करण्याकरिता ‘काम करण्याचे नाटक करण्याची’ सेवा देत आहेत. या कंपन्या दररोज सुमारे ३० युआन (Yuan) म्हणजे जवळपास २९० रुपये शुल्क आकारून ऑफिसची जागा (Office Space), संगणक (Computer) आणि फोनसह (Phone) मॉक वर्कस्टेशन्स (Mock Workstations) उपलब्ध करून देतात.

सामाजिक दबावामुळे वाढतेय मागणी :

अनेक कंपन्या सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत काम करण्याची संधी देत आहेत, ज्यात जेवणाची वेळदेखील समाविष्ट आहे. चीनमधील (China) एका माजी ई-कॉमर्स (E-commerce) कर्मचाऱ्याची नोकरी गेली. त्याचे कुटुंब त्यामुळे काळजीत पडेल यासाठी तो कामावर जाण्याचा दिखावा करतो. एका तरुणाने मैत्रिणीने नाते तोडू नये यासाठी नोकरी गेल्याचे लपवले.

Employed l आळस वाढविणाऱ्या कंपन्या आणि हॉटेल्स :

या पार्श्वभूमीवर अमेरिकेत (America) मात्र याच्या अगदी उलट चित्र आहे. तेथे एका बाजूला बेरोजगारी लपवण्यासाठी कंपन्या वेगवेगळ्या सेवा देत असतानाच, लोकांना पूर्वीपेक्षा जास्त आरामदायी सुविधा देऊन त्यांच्या आळसाला खतपाणी घालणाऱ्या कंपन्या तसेच हॉटेल्सही (Hotels) उघडली असून तशा सेवा पुरवल्या जात आहेत. यात काही हॉटेल्स (Hotels) ग्रंथालयाची (Library) सेवा पुरवत आहेत, तर काही आरामात पडून राहण्यासाठी सोकिंग टबसारख्या (Soaking Tub) सुविधा देत आहेत. हिवाळ्याच्या काही महिन्यांत थंडीमुळे काहीही काम करावेसे वाटत नाही, त्या काळात या सुविधा अधिक प्रमाणात पुरवल्या जातात.

बेरोजगारीचा (Unemployment) दर ५.१ टक्क्यांवर :

चीनमध्ये (China) डिसेंबर २०२४ मध्ये बेरोजगारीचा (Unemployment) दर ५.१ टक्क्यांवर पोहोचला आहे. बेरोजगारी आणि सामाजिक दबावामुळेच (Social Pressure) नोकरी करण्याच्या दिखाव्याला किंवा नाटकाला प्रोत्साहन देणाऱ्या विविध प्रकारच्या सेवांचा जन्म झाला असल्याचे तेथील वुहान विद्यापीठाच्या (Wuhan University) समाजशास्त्र अभ्यासक प्राध्यापकांनी म्हटले आहे.

News Title : Pay 290 Rupees and Pretend to be Employed: New Trend in China

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .