बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! आता ‘या’ गोष्टीसाठीही मोजावे लागणार पैसे

पुणे | शहरात खासगी वाहनांची संख्या वाढल्याने पार्किंगचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित होत आहे. त्यामुळे पुण्यातील प्रमुख रस्त्यांवरील मोफत पार्किंग बंद करून त्याजागी सशुल्क पार्किंग अर्थात ‘पे अँड पार्क’ (Pay & Park) करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar) व पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांच्यात एक महत्त्वाची बैठक पार पडली. यात मोफत पार्किंग बंद करून सशुल्क पार्किंग सुरू करण्याबाबत निर्णय झाला.

खासगी वाहनांच्या संख्या वाढल्याने पुण्यात पार्किंगचा प्रश्न निर्माण होत आहे. पार्किंगसाठी शिस्त लागावी व नागरिकांनी सार्वजनिक वाहतून व्यवस्थेचा जास्तीत जास्त वापर करावा या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता पुणेकरांना गाडी पार्क करण्याचे पैसे मोजावे लागणार आहेत.

दरम्यान, शहरातील प्रमुख रस्त्यांवर पे अँड पार्कची सुविधा सुरू केली जाणार आहे. त्यासाठी पोलीस आयुक्तांशी चर्चा केली आहे. हे रस्ते कोणते असतील हे अद्याप ठरलेलं नाही. मात्र, वाहतूक पोलिसांशी चर्चा करून लवकरच अंमलबजावणी सुरू केली जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

“…त्यांना मी परवडणार नाही”, बॉलिवूडबद्दल महेश बाबू बेधडक बोलला

‘राज ठाकरे चुहा है’, भाजप खासदाराच्या वादग्रस्त वक्तव्याने खळबळ

टेंशन वाढलं! राजेश टोपेंनी दिले कोरोनाच्या चौथ्या लाटेचे स्पष्ट संकेत

कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्यापूर्वी चुकुनही करू नका ‘ही’ चूक

उष्णतेच्या लाटेसह राज्याला अवकाळी पाऊस झोडपणार, ‘या’ जिल्ह्यांना इशारा जारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More