बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“50 लाख रुपये द्या नाहीतर परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर आरडीएक्सनं उडवेल”

बीड | देशातील बारा ज्योतीर्लिंगांपैकी एक प्रभू वैद्यनाथाचे मंदिर (Parli Vaidyanath Jyotirlinga) परळी येथे आहे. या मंदिराच्या दर्शनासाठी राज्य व पर राज्यातून भाविक येत असतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे मंदीर बंद करण्यात आलं होतं. आता कोरोना आटोक्यात येत असताना पुन्हा एकदा हे मंदीर उघडण्यात आलं आहे. अशातच परळी येथील वैद्यनाथ मंदीर आरडीएक्सनं उडवण्याची धमकी मिळाली आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं बीडमधील परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर उडवून देण्याच्या धमकीमुळे सध्या सगळीकडे खळबळ उडाली आहे. परळीच्या वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे राजेश देशमुख हे सचिव आहेत. त्यांना एक पत्र मिळालं आहे. यामध्ये  मंदिर समितीकडे एका गुंडाने 50 लाख रुपयाची (50 lakh threatened letter) खंडणी मागितली आहे.

अद्याप मंदीर उडवण्याची धमकी नेमकी कोणी दिली याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, 50 लाख रुपये द्या अन्यथा मंदिर उडवू असं, या पत्रात सांगण्यात आलंय. या धमकीमुळे मंदिर प्रशासनही धक्क्यात आहे.

दरम्यान, पत्रामध्ये पुढे असं म्हटलंय की, मी फार मोठा नामी गुंड आहे. याशिवाय ड्रग्ज माफिया आणि पिस्तूल धारकही आहे. हे पत्र मिळताच आपण मला वरील रक्कम माझ्या खालील पत्त्यावर ताबडतोब पोस्ट करावी, नाहीतर आपलं मंदिर संस्थान माझ्याकडील आरडीएक्स उडवून लावेल.

थोडक्यात बातम्या – 

“वीर दासने दोन भारत दाखवले म्हणून उच्चभ्रूंच्या कपाळात…”

शेअर बाजारात घसरण पण ‘बिगबुल’च्या शेअर्समध्ये तब्बल एवढ्या टक्क्यांची वाढ

मुंबईतील कोरोनाबाधितांसह मृतांची संख्याही दिलासादायक, वाचा ताजी आकडेवारी

“जरा जास्तच मुदत दिल्याबद्दल नारायण राणेेेंचे आभार”, जयंत पाटलांचा पलटवार

महाराष्ट्रातील कोरोना आला आटोक्यात, जाणून घ्या आकडेवारी एका क्लिकवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More