देश

नेहरुंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या पायल रोहतगीला अभिनेत्रीला अटक!

जयपूर | काही दिवसांपूर्वी अभिनेत्री पायल रोहितगीने स्वतंत्र्य सेनानी मोतीलाल नेहरु यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. तिच्या या वक्तव्यावरुन पायल रोहितगीला राजस्थान पोलिसांनी अटक केली आहे. पायलने स्वत: ट्वीट करुन ही माहिती दिली आहे.

पायलने काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ तयार करून त्यात मोतिलाल नेहरू यांच्या पाच पत्नी होत्या आणि जवाहरलाल नेहरू हे त्यांचे पुत्र नसल्याचे आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्यानंतर तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.

काँग्रेस नेता चरमेश शर्मा यांनी तिच्याविरोधात राजस्थान पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर तिच्याविरोधात आयटी अ‌ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला.

दरम्यान, पायलने याआधी जवाहरलाल नेहरू, छत्रपती शिवाजी महाराज, राजा राम मोहन रॉय यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केली होती. या वक्तव्यावरून तिच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

 

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या