मुंबई | डाॅ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणाला आता नवं वळण लागण्याची शक्यता आहे. कारण पायल यांच्या मानेवर, पाठीवर आणि गुप्तांगावर जखमा असल्याचं शवविच्छेदन अहवालात नमुद करण्यात आल्याने ही आत्महत्या नसून हत्या आहे, असं पायल यांची बाजू मांडणारे वकील नितीन सातपूते यांनी म्हटलं आहे.
नायर रुग्णालयातील डॉक्टर पायल तडवी या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होत्या. त्यांनी विद्यार्थीनींच्या रॅगींगला कंटाळून मुंबईच्या नायर रुग्णालयातील कॉलेज हॉस्टेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती.
आग्रीपाडा पोलिसांनी महाविद्यालयातील वरिष्ठ असणाऱ्या डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहेर, डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघांविरोधात अॅट्रोसिटी आणि रॅगिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, न्यायालयाने आज तिन्ही आरोपींना 31 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
महत्वाच्या बातम्या
-राहुल गांधींच्या मनधरणीसाठी शिला दीक्षितसह काँग्रेस नेत्यांचं धरण आंदोलन
-“शिवसेनेनं अनेकदा लोळवूनही राणेंचं तोंड वर करुन बोलणं चालूच आहे”
-मी राहुल गांधींच्या जागी असतो तर…रोहित पवार म्हणतात…
-काँग्रेस आमदार भाजपमध्ये जाणार? अशोक चव्हाण म्हणतात…
-नाशिकच्या शेतकऱ्याचं मोदींना पत्र; म्हणतो गडकरींनाच ‘कृषीमंत्री’ करा
Comments are closed.