बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबई इंडियन्समध्ये स्टार खेळाडूंचा भरणा, मात्र तरीही ‘ही’ एक गोष्ट पडू शकते महागात!

मुंबई | जगातली सगळ्यात मोठी टी-20 लीग असलेल्या ‘आयपीएल’ला 9 एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. यावर्षी पहिला सामना गतविजेती मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु यांच्यात रंगणार आहे. मुंबई इंडियन्स ही ‘आयपीएल’ इतिहासातली सगळ्यात यशस्वी टीम आहे. मुंबईने 5 वेळा ‘आयपीएल’ ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. आता सहाव्यांदा आणि लागोपाठ तीनवेळा आयपीएल जिंकण्यासाठी मुंबई मैदानात उतरेल. मात्र, मुंबईच्या टीमला एकाच गोष्टीची चिंता असेल, ती म्हणजे कर्णधार रोहित शर्माचा फॉर्म.

मागच्या काही वर्षांमध्ये ‘आयपीएल’मध्ये रोहित शर्माची बॅट म्हणावी तशी चालली नाही. ‘आयपीएल’ मधल्या अन्य कर्णधारांच्या तुलनेत रोहित शर्माची बॅटिंग सरासरी सगळ्यात कमी आहे. असं असलं तरी मागच्या वर्षी दिल्लीविरुद्धच्या फायनलमध्ये रोहितने आक्रमक अर्धशतक करत मुंबईला विजय मिळवून दिला होता.

श्रेयस अय्यरला दुखापत झाल्यामुळे दिल्ली कॅपिटल्सने रिषभ पंतला आणि राजस्थान रॉयल्सने संजू सॅमसनला कर्णधार केलं आहे. हे दोघं पहिल्यांदाच ‘आयपीएल’मध्ये नेतृत्व करताना दिसतील. कर्णधार म्हणून केएल राहुलची कामगिरी सर्वोत्तम झाली आहे. राहुलला मागच्या मोसमात पंजाबचं नेतृत्व देण्यात आलं, यानंतर 14 सामन्यांमध्ये त्याने 56 च्या सरासरीने रन केले.

दरम्यान, कोलकात्याने मागच्या मोसमात अर्ध्यातच इयन मॉर्गनला नेतृत्व दिलं. कर्णधार झाल्यावर मॉर्गनने 7 इनिंगमध्ये 49 च्या सरासरीने रन केले. तर बंगळूरुचा कर्णधार झाल्यानंतर विराट कोहलीने इनिंगमध्ये 44 च्या सरासरीने 4 हजार 800 रन केले. ‘आयपीएल’मध्ये सर्वाधिक रन करण्याऱ्या कर्णधाराचा विक्रमही विराटच्या नावावर आहे. धोनीने कर्णधार म्हणून 42 च्या सरासरीने 4 हजार रन तर रोहितने 30 च्या सरासरीने 3 हजार रन केले आहेत.

थोडक्यात बातम्या – 

क्रिकेटप्रेमींसाठी खूशखबर; भारतातील ‘या’ मैदानावर होऊ शकतो T20 World Cupचा पहिला सामना

आयपीएल सुरु होण्याआधीच विराट कोहलीला मोठा धक्का, ‘ही’ भविष्यवाणी खरी ठरली तर…

काल जुळ्या मुलांना दिला जन्म, आज कोरोनामुळे आईचा मृत्यू

आयपीएल सुरु होण्याआधीच धोनी फुल्ल फॅार्ममध्ये; CSKनं शेअर केला ‘हा’ व्हिडीओ

चुकून गोळी लागून झाला मित्राचा मृत्यू, अपराधी भावनेतून तीन जणांची आत्महत्त्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More