कर्मचाऱ्यांकडूनच ‘पेटीएम’चा डेटा चोरी; कंपनीकडे 20 कोटींची मागणी

नवी दिल्ली | डिजीटल कंपनी ‘पेटीएम’ला डेटा चोरीचा फटका बसला आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच महत्त्वाचा डेटा चोरल्याचा प्रकार उघड झाला आहे.

चोरलेला डेटा लिक करण्याची धमकी कंपनीच्या मालकाला देण्यात आली होती. त्याबदल्यात 20 कोटी रूपयांची मागणीही केली होती. 

पेटीएमचे मालक विजय शेखर यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी तीन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. 

दरम्यान, धमक्यांच्या फोन कॉल्सने आम्ही त्रासलो होतो. मात्र पोलिसांनी अत्यंत हुशारीने या कर्मचाऱ्यांना अटक केली आहे, असं एका कर्मचाऱ्याने सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-देशभरात फटाक्यांच्या विक्रीवर बंदी?; सर्वोच्च न्यायालय आज देणार निर्णय

-…नाहीतर मराठा समाज पुन्हा आक्रमक होईल; मराठ्यांचा इशारा  

-शिवसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपची नवी रणनीती?

-‘एमआयएम’नंतर आता प्रकाश आंबेडकरांचाही ‘वंदे मातरम्’ला विरोध!  

-या सरकारने जलयुक्त शिवारातून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे- सुप्रिया सुळे