बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काय सांगता! गॅस सिलेंडर बुकींगवर चक्क मिळतंय सोनं

नवी दिल्ली | सध्या देशात गॅसच्या दरवाढीने सामान्य जनता हैरान झाली आहे. त्यातच आता सण आलेले असल्याने गॅस सिलेंडरची गरज अधिक पडणार आहे. मात्र आता पेटीएमने नवरात्रीच्या मुहूर्तावर ग्राहकांसाठी गॅस सिलेंडर बुकींगवर एक ऑफर आणली आहे. ‘नवरात्री गोल्ड ऑफर’ अशी ती ऑफर आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना चक्क सोनं जिंकण्याची संधी मिळणार आहे.

काय आहे ऑफर- 

7 ते 16 ऑक्टोबरच्या दरम्यान दररोज पेटीएमवरून सिलेंडर बुक करणाऱ्या 5 नशिबवान ग्राहकांना 10,001 रुपयांचं सोनं जिंकण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय प्रत्येक पेटीएम यूजरला प्रत्येक बुकींगवर 1000 कॅशबॅक पाँईट मिळणार आहेत. ज्यांना टॉप ब्रॅंडच्या डिल आणि गिफ्ट व्हाउचर्समध्ये रिडीम केलं जाऊ शकतं. ही ऑफऱ इण्डेन, एचपी, भारत गॅस या तीनही एलपीजी गॅसवर उपलब्ध असणार आहे.

बुकींग कसे कराल?

पेटीएममधून गॅस बुक करण्यासाठी ग्राहकांना पेटीएम अॅपवरील ‘बुक गॅस सिलेंडर’ हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर गॅस पुरवठादार निवडावा लागेल. त्यानंतर मोबाईल नंबर, एलपीजी आयडी टाकायचा आहे. त्यानंतर पेमेंट कसं करायचे यासाठी पर्याय दिलेले आहेत. त्यातील पर्याय निवडून पेमेंट करायचे आहे. त्यानंतर तुमचा गॅस सिलेंडर बुक होणार आहे.

पेटीएम कंपनीने ग्राहकांसाठी नवीन अपडेट केल्या आहेत. ज्यामध्ये ग्राहकांना गॅस सिलेंडरची डिलिव्हरी ट्रॅक करण्याचं फिचरही दिलेलं आहे. शिवाय रिफीलींग म्हणजे पुन्हा भरून आणण्यासाठी ग्राहकांना रिमायंडर सुद्धा मिळणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

आर्यन खान प्रकरणात नवा ट्विस्ट; साक्षीदार तर निघाला फरार आरोपी

एनसीबी कारवाईबाबत नवाब मलिक करणार मोठा गौप्यस्फोट, तर्कवितर्कांना उधाण

महामार्गासाठी जमीन दिल्यास मिळणाऱ्या मोबदल्यात कपात; शेतकऱ्यांमधून नाराजीचा सुर

“फोनवरून टिका करणं सोपं आहे, मात्र तिकडे एनसीबीचे लोक लढा देतायेत”

प्रसिद्ध कोरिओग्राफर पुनित पाठकचा पत्नीसोबतचा बेडरुममधील ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल

 

 

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More