बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पेटीएमची मोठी मदत, भारताला ‘इतके’ हजार ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर देणार

नवी दिल्ली | भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं आहे. मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत असून अनेकजण आपला जीव देखील गमावत आहे. यामागे अनेकवेळा ऑक्सिजन बेड्स यांचा तुटवडा कारणीभूत ठरत आहे. अशातच अनेक मोठ्या कंपन्यांनी मदतीचा हात पुढे केला. यादरम्यान, आता पेटीएमने देखील मोठी घोषणा केली आहे. या घोषणेमध्ये पेटीएम कंपनी भारताला ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर देणार असल्याचं म्हटलं आहे.

पेटीएम कंपनीने भारतासाठी ऑक्सिजन फाॅर इंडिया या नावाने एक नवीन मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेतून जनजागृती करण्यात येणार आहे. पेटीएमने सोमवारी ही घोषणा केली आहे. पेटीएम फाउंडेशनने 1 हजार ऑक्सिजन कन्सन्ट्रेटरच्या आयातसाठी ऑर्डर दिली आहे. याची बाजारात 4 कोटी किंमत आहे. कंपनीने लोकांकडून 10 कोटी रुपये जमा करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पेटीएम फाउंडेशने 3 हजार ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर आयात करण्याची योजना बनवली आहे.

हे ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर हॉस्पिटल, क्लिनिक आणि रेजिडेंट वेलफेयर असोसिएशनला दिले जाणार आहे. पेटीएमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शंकर शर्मा यांनी म्हटले की, मी अन्य स्टार्टअप कंपन्यांना आवाहन करतो की, त्यांनी या मोहिमेत सहभाग घेऊन मदत करावी. आमच्या एक रुपयांच्या मदतीत त्यांनी एक रुपया मिळावा. म्हणजेच ऑक्सिजन कन्सट्रेटरची संख्या दुप्पट होईल.

दरम्यान,भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सोमवारी ट्विट करून भारताला 135 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. हे पैसे गीवइंडिया आणि UNICEF ला दिले जाणार आहेत. याच्या मदतीने सर्व पीडितांपर्यंत कॅश आणि मेडिकल सप्लाय केले जाणार आहेत. ज्यात ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर आदीचा समावेश आहे.

थोडक्यात बातम्या-

“सरकारवर खापर फोडण्याआधी स्वत: शिस्त पाळा”; बेशिस्त नागरीकांना औरंगाबाद खंडपीठाचे खडे बोल

व्हॅाट्सॲपच्या ॲडमीनसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय

18 वर्षांवरील कोरोना लसीकरणावर विघ्न; मुंबई महापालिका आयुक्त म्हणतात…

रश्मी शुक्ला यांना सायबर सेलचं समन्स; फोन टॅपिंग प्रकरण अंगलट येण्याची शक्यता

खुशखबर! मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातुन कोरोना हद्दपार, तज्ज्ञ म्हणतात…

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More