PBKS vs DC Live Streaming l आयपीएल 2024 स्पर्धेत आज डबल हेडर सामन्यांचा थरार रंगणार आहे.IPL 2024 चा दुसरा सामना हा 23 मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज (PBKS vs DC) यांच्यात होणार आहे. हा सामना महाराजा यादविंदर सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, चंदीगड येथे पार पडणार आहे. सर्वात विशेष बाब म्हणजे दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार ऋषभ पंत तब्बल 14 महिन्यांनंतर क्रिकेटच्या मैदानात परतणार आहे, तर पंजाब किंग्जचे नेतृत्व शिखर धवनकडे आहे.
PBKS vs DC Live Streaming l दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्जमध्ये रंगणार सामना! :
गेल्या आयपीएल हंगामातील खराब कामगिरीनंतर दोन्ही संघ यावेळी चांगली सुरुवात करणार आहेत. गेल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स 9व्या तर पंजाब 8व्या क्रमांकावर होते.अशा परिस्थितीत आज होणाऱ्या पहिल्या डबल हेडर सामन्यासाठी चाहत्यांना संभाव्य प्लेइंग-11 काय असेल याबाबतची माहिती जाणून घेऊयात…
अशी असेल संभाव्य प्लेइंग-11 :
पंजाब किंग्स- शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरान, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), ऋषी धवन, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग.
दिल्ली कॅपिटल्स- डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, मुकेश कुमार, खलील अहमद.
किती वाजता होणार पंजाब किंग्स वि दिल्ली कॅपिटल्सची लढत :
आयपीएल 2024 चा पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील दुसरा सामना स्टार स्पोर्ट्स या चॅनेलवर पाहता येईल. याशिवाय Jio Cinema ॲप डाउनलोड करून तुम्ही IPL 2024 च्या सामन्यांच्या लाइव्ह स्ट्रीमिंगचा मोफत आनंद घेऊ शकता. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता सुरू होणार आहे.
News Title : PBKS vs DC Live Streaming
महत्त्वाच्या बातम्या-
शिंदे गटाला खिंडार?, ‘हा’ बडा नेता अजित पवार गटात जाण्याची शक्यता
रहाणे आणि रचीनचा अफलातून झेल, विराट बघतच राहिला; व्हिडीओ व्हायरल
प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगे यांना मोठा सल्ला; म्हणाले…
भाजपला मोठा धक्का; ‘हा’ मित्र पक्ष स्वबळावर निवडणूक लढणार
विराट कोहलीचं पहिल्याच सामन्यात लज्जास्पद कृत्य, व्हिडीओ होतोय जोरदार व्हायरल