बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काजू-बदाम कशाला??? फक्त शेंगदाणे खा… होतील फायदेच फायदे

मुंबई | सध्याच्या धगधगत्या जीवनात लोक आपल्या आरोग्याबाबत खूप जागृक असतात. आपणही इतरांप्रमाणे सुदृड दिसावं, असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यामुळे काहीजण जीम लावतात. काही आरोग्याला पोषक पदार्थ अन्न घेतात. पण अनेकांना काय खावं आणि काय खावू नये याबद्दल अनेकांना माहिती पुरेश्या प्रमाणात नसते. वजन कमी करण्यासाठी अनेकजण तेलकट पदार्थ खाण्याचं टाळतात. अन्नात शेंगदाण्याचा समावेश करत नाहीत. मात्र, शेंगदाणे आरोग्यसाठी खूप फायदेशीर ठरतात.

गरिबांचं बदाम म्हणल्या जाणारे शेंगदाणे शरिरासाठी खूप फायद्याचं ठरतं. शेंगदाणे आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी लाभदायक ठरतं. शेंगदाण्यात असलेल्या काही गुणधर्मामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. रोजच्या आहारात शेंगदाण्याचा समावेश केल्याने शरिरातील चरबी कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर शरिरातील मृत आणि जिवंत पेक्षींमध्ये संतुलन राखण्यास देखील मदत होते.

महिलांसाठी शेंगदाणे खाणं फायदेशीर ठरतं. गरोदरपणात शेंगदाणे खाल्ल्याने पोटदुखीचा त्रास देखील कमी होतो. तर मासिक पाळीवेळी वेदनांपासून देखील आराम मिळतो. त्याचबरोबर प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी त्याचा फायदा होतो. गरोदरपणात शेंगदाणे भिजवून खाणं आरोग्यासाठी फायद्याचं ठरतं.

दरम्यान, शेंगदाणे त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी मदतीशीर ठरतं. तसेच शेंगदाण्यात बायोटीनचं प्रमाण जास्त असल्याने त्याचा केसांना फायदा होतो. मात्र, जास्त प्रमाणात शेंगदाणे खाल्याने पित्ताचा त्रास देखील होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेंगदाण्याचं सेवन पुरेश्या प्रमाणात करण्याची गरज आहे.

थोडक्यात बातम्या-

फडणवीसांना मुख्यमंत्री असल्यासारखं का वाटतं?, चंद्रकांत पाटलांनी सांगितलं खरं कारण

“…असं यापूर्वी कधीच घडलं नव्हतं”; शरद पवार भाजपवर संतापले

‘मोदी लखीमपूर हिंसाचारावार बोलत का नाहीत?’, निर्मला सीतारमन म्हणतात…

“पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेचा महापौर असावा ही जनतेची इच्छा”

रात्री 11.30 ते सकाळी 6 व्हॉट्सअप बंद राहणार?; पीआयबीकडून मोठं स्पष्टीकरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More