Top News देश

दिल्लीत शेतकरी आक्रमक, शेतकरी आंदोलक लाल किल्ल्यावर धडकले!

नवी दिल्ली | दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण मिळालं आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती. या रॅलीदरम्यान पोलीस आणि शेतकरी यांच्यात वाद झाला आणि शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केला.

शेतकरी आंदोलकांची संख्या जास्त असल्याने ते पोलिसांवरच धावून जाताना दिसत होते. शेतकरी नेमके कुठे जात आहेत हे माहित नव्हतं. मात्र आता शेतकरी लाल किल्ल्यावर पोहोचले आहेत.

शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर जाऊन तेथे ध्वज फडकावला. दिल्ली पोलिसांच्या हाताच्या ही परिस्थिती बाहेर गेली आहे. राजपथावर मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर आणि आंदोलक शेतकरी जाताना दिसले.

दरम्यान, दिल्लीतील काही मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले आहेत. शेतकरी ट्रॅक्टर घेऊन ते पोलिसांच्या अंगावर नेताना दिसत आहेत.

थोडक्यात बातम्या-

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण, दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीचार्ज

‘राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी संविधान स्तंभ उभारा’; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

प्रख्यात गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांना पद्मविभूषण

शरद पवारांनंतर अजित पवारांनीही साधला राज्यपालांवर निशाणा; म्हणाले…

बुलेट ट्रेन दिल्यामुळेच जपानच्या माजी पंतप्रधानांना पुरस्कार- संजय राऊत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या