‘तुझ्या बापाला’ म्हणत किशोरी पेडणेकरांचं नेटकऱ्याला उत्तर!

मुंबई | महापौर किशोरी पेडणेकर यांनी ट्विटरवर एका नेटकऱ्याला दिलेल्या उत्तरामुळे चांगल्याच ट्रोल होऊ लागल्या आहेत. ट्विटरवर एका युजरला उत्तर देताना पेडणेकर यांनी जो शब्द वापरला आहे त्यावरुन त्या ट्रोल होत आहेत.

मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केली होती. ही मुलाखत मुंबईतील 1 कोटी लसीकरणाच्या संदर्भातील होती. ज्यामध्ये महापौर किशोरी पेडणेकर यांनी ग्लोबल कंत्राटाला 9 कंपन्यांचा प्रतिसाद मिळाल्याचा उल्लेख केला होता.

महापौर किशोरी पेडणेकर यांच्या या ट्विटवर एका नेटकऱ्याने त्यांना प्रश्न विचारला की, कुठल्या कंपन्यांना लस पुरवठ्याचं कंत्राट दिलं आहे. यावर संतापलेल्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्याला मराठीत ‘तुझ्या बापाला’ असं उत्तर दिलं.

दरम्यान, किशोरी पेडणेकर यांनी अखेर आपलं हे ट्विट डीलिट केलं आहे. मात्र असं असलं तरी त्यांच्या या ट्विटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

आज महाराष्ट्रात कोरोनाचे किती रुग्ण आढळले?; सर्व आकडेवारी एका क्लिकवर…

‘या’ राज्याने 12 वीच्या बोर्डाची परीक्षा केली रद्द; विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची- मुख्यमंत्री

दोन चित्रपटांनंतर आणखी एका चित्रपटातून कार्तिक आर्यन बाहेर; मेकर्सनं केला खुलासा, म्हणाले…

“भाजप सामाजिक वाद निर्माण करून राजकीय पोळी भाजतंय”

डान्सर राघव जुयाल कोरोनाग्रस्तांची करतोय मदत, सोशल मीडियावर होतोय कौतुकाचा वर्षाव

 

Kishori PednekarMayorPatientShivsenaVaccineकिशोरी पेजणेकरकिशोरी पेडणेकरमहापौररूग्णलसशिवसेना