बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ममता बॅनर्जींचा मोठा गौप्यस्फोट; राजकीय वर्तुळात खळबळ

नवी दिल्ली | मागील अनेक महिन्यांपासून इस्त्रायलच्या पेगासस सॉफ्टवेअरवरून मोठा गोंधळ झाला आहे. यातच आता पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी गुरूवारी याच पेगासस(Pegasus) सॉफ्टवेअरबाबत मोठा दावा केला आहे.

ममता बॅनर्जी यांनी चार वर्षांपूर्वी त्याच्या सरकारला पेगासस खरेदी करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता, अशी धक्कादायक महिती दिली आहे.

25 कोटी रूपयांमध्ये पश्चिम बंगाल सरकारला पेगागस विकत देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र आम्ही नागरीकांच्या गोपीनियतेचा सन्मान करत असल्यानं तो प्रस्ताव नाकारला होता, असं बॅनर्जी म्हणाल्या.

ममता बॅनर्जी यांनी पेगासवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. आंध्र प्रदेशमध्ये चंद्रबाबू नायडू मुख्यमंत्री असताना त्यांनी पेगासचा लाभ घेतला होता.

संध्याच्या केंद्र सरकारकडून नेते, न्यायमूूर्ती, अधिकारी, पत्रकार, नोकरशाही आणि समाजसेवक यांची हेरगिरी करण्यात आल्याची टीका बॅनर्जी यांनी केली. तर, पेेगासच्या माध्यमातून कुणाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणायची इच्छा नव्हती. पेगाससच्याद्वारे माझी देखील हेरगिरी होतीये, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

दरम्यान, पेगाससचा वापर राजकीय नेते, न्यायमूर्ती आणि अधिकाऱ्याच्या विरोधात वापरला जाऊ शकला असता, ते योग्य नव्हतं, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मुकेश अंबानींचा जगातील पहिल्या दहा श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश!

युद्धादरम्यान भारताने रशियासोबत केला ‘हा’ मोठा व्यवहार

शरद पवारांकडून भाजप नेत्यांवर कौतुकाचा वर्षाव, म्हणाले…

पुतिन यांना मनोरूग्ण म्हणणाऱ्या मॉडेलचा सुटकेसमध्ये आढळला मृतदेह

मोठी बातमी! शिवसेनेचा मोठा नेता आयकर विभागाच्या रडारवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More