बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Second Dose घेतलाय का? नसेल तर भरावा लागणार 500 रूपये दंड

औरंगाबाद | कोरोना (Corona) रूग्णसंख्या कमी व्हावी, यासाठी देशभर लसीकरण (Vaccination) मोहिम राबवण्यात येत आहे. अनेकांचं लसीकरण आता पुर्ण देखील झालं आहे. मात्र, अनेक नागरिक दुसरा डोस (Second Dose) घेण्यास टाळाटाळ करत असल्याचं दिसत आहे. अशातच आता ज्या नागरिकांनी लसीकरणाचा दुसरा डोस घेतला नाही. त्यांना आता 500 रूपये मोजावे लागणार आहेत. (Penalty of Rs.500 for not taking second dose)

ज्या नागरिकांनी पहिला डोस घेऊन 85 दिवस पूर्ण झाली आहेत. मात्र त्या नागरिकांनी दुसरा डोस घेणं बाकी आहे, अशा नागरिकांना दर 15 दिवसांनी 500 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. येत्या 15 डिसेंबरपासून या कारवाईस सुरूवात होणार असल्याचं औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितलं आहे.

औरंगाबादमध्ये 5 डिसेंबरपासून ही कारवाई करण्यात येणार आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकाऱ्यांनी  कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सक्तीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता लसीकरण केंद्रावर गर्दी देखील वाढताना दिसत आहे.

दरम्यान, सध्या देशासह जगभरावर ओमिक्राॅनचं संकट ओढावलं आहे. त्यामुळे लसीकरणाला वेग आला आहे. केंद्र सरकारने देखील लसीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता नागरिकांना स्वत:हून लसीकरण पुर्ण करणं गरजेचं आहे.

थोडक्यात बातम्या-

मराठवाड्याचं टेंशन वाढलं! ‘या’ शहरात आढळला Omicronचा रूग्ण

“जेव्हा औरंगजेब येतो, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज उभे राहतात”

श्रीनगरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला, 14 जवान जखमी तर 5 गंभीर

शरद पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचा पक्षाला रामराम

“एवढं तरी वाचायला हवं, इतकं बावळट असून चालत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More