बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

18 वर्षांवरील व्यक्तींनाही मिळणार बूस्टर डोस, मोजावे लागणार ‘इतके’ रूपये

मुंबई | 10 एप्रिल 2022 पासून देशात 18 वर्षावरील सर्व नागरिकांना प्रिकॉशन डोस अर्थात बूस्टर डोस (Booster Dose) दिला जाणार आहे. मोदी सरकारने (Modi Goverment) हा मोठा निर्णय जाहीर करत 18 वर्षावरील नागरिकांच्या बूस्टर डोसचा मार्ग मोकळा केला आहे.

कोरोना लसीचा तिसरा अर्थात बूस्टर डोस मोफत मिळणार नसून नागरिकांना त्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने (Serum Institute) त्यांच्या कोविशिल्ड (Covishield) लसीच्या बूस्टर डोसची किंमत जारी केली आहे. कोविशिल्डच्या बुस्टर डोसची किंमत 600 रूपये निश्चित करण्यात आली आहे.

18 वर्षांवरील ज्या नागरिकांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 9 महिने पूर्ण झाले आहेत ते बूस्टर डोस घेण्यासाठी पात्र असतील, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. खासगी लसीकरण केंद्रावर 18 वर्षावरील वयोगटातील नागरिकांसाठी हा डोस उपलब्ध करण्यात येणार आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने यापूर्वी 60 पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींना कोरोना लसीचा बूस्टर डोस देण्यासाठी मंजूरी दिली होती. त्यानंतर आता 18 वर्षावरील नागरिकांना बूस्टर डोस मिळणार असल्याची घोषणा मोदी सरकारकडून करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त 100 रूपयांपासून करू शकता गुंतवणूक

‘अस्वस्थ, अशांत, अतृप्त आत्मे’, शरद पवारांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया

कार्डशिवायही काढता येणार एटीएममधून पैसे, आरबीआयने केली मोठी घोषणा

“कर्म याच जन्मात फेडावे लागतात, यातून कोणीच वाचत नाही”

मोठी बातमी! किरीट सोमय्यांना मुंबई पोलिसांचा झटका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More