Top News खेळ

दिवाळीनिमित्त शुभेच्छा देणाऱ्या कोहलीच्या व्हिडीयो मेसेजवर चाहते संतापले, म्हणाले…

नवी दिल्ली | दिवाळीच्या सणानिमित्त टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने देशातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या. यासाठी त्याने खास एक व्हिडीयो शूट करून ट्विटरवर शेअर केलाय. मात्र या व्हिडीयोमुळे चाहते चांगलेच नाराज झालेत.

ट्विटरवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये कोहली म्हणतो, ”दिवाळीचा हा सण तुमच्या आयुष्यात आनंद, भरभराट आणि समाधान घेऊन येवो. मात्र लक्षात ठेवा फटके फोडू नका, निसर्गाचं संरक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. साधारण दिवे आणि मिठाईसह कुटुंबासोबतच दिवाळी साजरी करा. स्वत:ची काळजी घ्या!”

याच मेसेजवरून चाहते कोहलीवर संतापले आहे. कारण काही दिवसांपूर्वी विराटचा वाढदिवस झाला. या वाढदिवसाला फटाखे फोडले तेव्हा कुठे गेला होता हा मेसेज असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित विराट कोहलीला विचारलाय.

अनेकांनी विराट कोहलीला ट्रोल करत #अनुष्का_अपना_कुत्ता_संभाल आणि अनुष्का हे हॅशटॅग वापरलेत. या मेसेजनंतर नेटकऱ्यांनी विराट कोहली-अनुष्का यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केलीये.

महत्त्वाच्या बातम्या

रामाचं राज्य येऊनही कोरोनाचा रावण मारला जात नाही; संजय राऊतांची टीका

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; पाडव्याच्या मुहूर्तावर सर्व धार्मिक स्थळं उघडणार

“कुंभकर्णी निद्रित असणारं अहंकारी महाराष्ट्र सरकार अखेर जागं झालं”

“देशात कोणीही सेक्युलर नाही, स्वत:ला सेक्युलर म्हणाणारे सर्वाधिक धर्मांध”

शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणाऱ्या राज्य सरकारचा निषेध- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या