बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘सॉरी, तुला खूप त्रास दिला…’; नेटकऱ्यांनी मागितली रिया चक्रवर्तीची माफी

मुंबई | बाॅलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने 14 जून 2020 ला त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. मात्र त्याची आत्महत्या नसून हत्या करण्यात आल्याचं म्हटलं जात होतं. विशेष म्हणजे ही हत्या त्याची प्रेयसी बाॅलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीने केल्याचा आरोप तीच्यावर केला गेला. तसेच ड्रग्सप्रकरणी रियाला अटक देखील करण्यात आली होती.

सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात अडकल्यापासून रिया सोशल मीडिया वरुन गायब झाली होती. मात्र महिला दिन दिवशी रियाने तब्बल 6 महिन्यांनंतर तीच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे.

या फोटोमध्ये तीने तीच्या आईचा हात पकडल्याचं दिसत आहे. या फोटोला रियाने आम्हाला महिला दिनाच्या शुभेच्छा, आई आणि मी, कायम एकत्र, माझी ताकद, माझा विश्वास, माझं मनोबल, माझी आई, असं कॅप्शन देखील दिलं आहे.

सहा महिन्यांनंतर पोस्ट केल्यामुळे रियाच्या अनेक फाॅलवर्सने यावर प्रतिक्रीया दिली आहे. काहींनी रियाला ट्रोल देखील केलं. मात्र एका युजरने तुला खूप त्रास दिला, तुझी माफी मागतो. देशाच्या मीडियाने तुझा खूप छळ केला आहे. पण तु फायटर आहेस आणि नेहमी राहणार, असं म्हणत एका युजरने रियाची माफी मागितली आहे.

थोडक्यात बातम्या-

उधारीचे पैसे मागणं पडलं महागात; विधवा महिलेसोबत घडली अत्यंत धक्कादायक घटना

गेल्या 10 दिवसांपासून जळतंय ओडिसाचं जंगल; हजारो प्राण्यांच्या जिवाला धोका

…अन् भर पत्रकार परिषदेत खासदारानं महिला आमदाराच्या गालाला लावला हात, पाहा व्हिडिओ

पुणे विद्यापीठाच्या परीक्षेचा पेच अखेर सुटला; ‘या’ तारखेपासुन परीक्षेला सुरूवात

लालूंच्या सुरक्षा रक्षकांनी पळवल्या गाद्या आणि उशा; रुग्णालयाची पोलिसांत धाव

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More