बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जनता भाजपला कंटाळली असून आता काँग्रेस हाच भाजपला एकमेव पर्याय”

जळगाव | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावर लढेल, असा नारा दिला असतानाच आता नाना पटोले यांनी भाजपला आता काँग्रेस पक्ष हाच एकमेव पर्याय असल्याचं बोलून दाखवलं आहे. जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

सध्या जनता भाजपला कंटाळली आहे आणि काँग्रेस विचार सरणीकडे मोठ्या प्रमाणात जनता वळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सध्या भाजपला काँग्रेस हाच एक पर्याय असून बूथ स्तरावर काम करून पक्षाचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करा, असं आवाहन नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी काँग्रेसचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचं आहे आणि काँग्रेस पक्षाला वैभव मिळवून देण्यासाठी काम करा, असे कार्यकर्त्यांना उद्देशून यावेळी नाना पटोले यांनी बोलून दाखवलं. यावेळी या आढावा बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण आणि महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर हे उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकार पुर्ण 5 वर्ष टिकणार असल्याचं सांगितलं असलं तरी, आता काँग्रेसची बदलती भूमिका महाविकास आघाडी सरकारपुढे संकट उभी करण्याची चिन्हं आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेवेळी शेवटची सहमती काँग्रेसने दर्शवली होती. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीत काँग्रेस नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

महाराष्ट्रातील कोणत्या महापालिका सध्या अनलॉकच्या कोणत्या स्तरामध्ये आहेत, जाणून घ्या एका क्लिकवर

महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट; पाहा दिलासादायक आकडेवारी

रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोसह निकृष्ट फीड देणाऱ्या कंपनीविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

‘एकत्र आलेल्या राजांचं स्वागत, पण त्यांचं बोलणं भाजपच्या मिठाला जागल्यासारखं; शिवसेनेचा खोचक टोला

कोरोना रुग्णांना आता ‘या’ गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या कोणता आहे हा आजार!

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More