बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जनता भोळी जरूर आहे पण मुर्ख नाही – चंद्रकांत पाटील

मुंबई | ओबीसी आरक्षणासाठी ठाकरे सरकारने नुकताच मोठा निर्णय घेतला आहे. ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे. मात्र त्याआधी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपने आज राज्यभर आंदोलन केलं आहे. त्यानंतर आता भाजप प्रदेशाध्याक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

भाजपा महाराष्ट्र वेळोवेळी ओबीसी समाजाच्या मागे खंबीरपणे उभी राहिली आहे. भाजपाने ओबीसींसाठी रस्त्यावर उतरून आंदोलने केली आणि आजही संघर्ष करत आहे. परंतु आपलं खोटं बाहेर पडेल या भीतीने भाजपाचे आजचे ओबीसी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न ठाकरे सरकार करत आहे, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

शेवटी सत्य कितीही झाकले तरी ते बाहेर पडणारच. महाविकास आघाडी सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला हे संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाजाला कळून चुकलं आहे. ‘जनता भोळी जरूर आहे, पण मूर्ख नाही’ हे मविआ सरकारने योग्यरीत्या लक्षात ठेवावे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

आपल्याला आता भाषण बंद आणि संघर्ष सुरू करावा लागणार आहे. फडणवीस सरकारने दिलेले 27% आरक्षण या मविआ सरकारने समाप्त केलं. वारंवार या सरकारने ओबीसी बांधवांवर अन्याय केला आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राज्यभर आमचा संघर्ष सुरुच राहणार असल्याचं देखील चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

महात्मा गांधींना RSSच्या विचारसरणीने का गोळ्या घातल्या?- राहुल गांधी

राजु शेट्टींची एक हाक, तीन दिवसात आले मिस्डकॉल सव्वादोन लाख

‘राष्ट्रवादी पक्ष रंगलेल्या गालाचा मुका घेणारा नाही तर…’; सुरेखा पुणेकरांचं दरेकरांना प्रत्युत्तर

मोठी बातमी! ओबीसी आरक्षणासाठी ठाकरे सरकार काढणार अध्यादेश

….म्हणून श्रीपाद छिंदमला पुन्हा अटक, ‘त्या’ प्रकरणामुळे अडचणीत!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More