बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अंबानींच्या घराचा पत्ता विचारणारे ‘ते’ दोघं होते तरी कोण?; आली ‘ही’ माहिती समोर

मुंबई | काही महिन्यांपूर्वी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली चारचाकी आढळ्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. त्या घटनेपासून सर्वच जण सतर्क झाले. त्यात काही दिवसांपूर्वी कॅबमधून आलेले 2 जण मुकेश अंबानींच्या निवासस्थानाचा पत्ता विचारत असल्याने चर्चांना उधाण आलं होतं.

निळ्या रंगाच्या कॅबमधून आलेल्या दोघाजणांनी आझाद मैदान परिसरात उभ्या असलेल्या एका टॅक्सी चालकाला मुकेश अंबानींच्या घराचा पत्ता विचारला. मॅपच्या आधाराने जा असं त्या टॅक्सीचालकाने सांगितलं पण अॅप खराब असल्याचं कॅबच्या चालकाने सांगितलं होतं. त्या दोघांचा वेश आणि सामान बघून टॅक्सीचालकाला संशय आला.

त्यानंतर त्या टॅक्सी चालकाने पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. कॅबचा रंग आणि नंबर वरून पोलिसांनी कॅब चालक सुरेश पटेलला शोधून काढलं. तर कॅबमध्ये असलेले ते दोघजण गुजरातमधून आलेले पर्यटक होते. ते फिरण्यासाठी मुंबईत आले होते. सर्व पर्यटनस्थळे पाहिल्यावर त्यांना अँटिलिया पाहायचं असल्याची माहिती त्या कॅब चालकाने दिली.

मला अँटिलियाचा पत्ता नीट माहिती नव्हता त्यात अॅप बंद असल्याने आम्ही पत्ता विचारला, असं कॅब चालक सुरेश पटेलने सांगितलं. तर कॅब चालकाने दिलेल्या माहितीनुसार आझाद मैदान पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असून त्या दोन गुजराती पर्यटकांची माहिती घेण्याचं कामही सुरू आहे.

थोडक्यात बातम्या-

“देवेंद्रजी, अंडरवर्ल्डशी संबंध असलेला ‘तो’ माणूस तुमच्या डिनर टेबलवर कसा?”

“तुम्ही मुख्यमंत्री असताना गुन्हेगारांना मोठ्या पदावर का बसवलं?”

देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात बनावट नोटांचं रॅकेट चालवलं जायचं- नवाब मलिक

रवि शास्त्रींनी नवीन प्रशिक्षक राहूल द्रविडबदद्ल व्यक्त केलं ‘हे’ मत

वानखेडे कुटुंबीय राज्यपालांच्या भेटीला; 2 गुन्हे दाखल झाल्याने नवाब मलिकांच्या अडचणी वाढल्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More