Top News देश

“मी मोदी सरकारला घाबरत नाही, हे लोक मला हात लावू शकत नाहीत पण…”

नवी दिल्ली  | कृषी कायद्याविरोधात शेतकरी गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. कृषी कायद्याच्या याच मुद्यावरुन काँग्रेस पक्षाचे नेते राहूल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

या तिन्ही कायदामुळं देशातील शेतकऱ्यांची वाट लागणार आहे, असं म्हणत मी मोदी सरकारला घाबरत नाही. हे लोक मला हात लावू शकत नाहीत. पण मला गोळी घालू शकतात, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

आज राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले की, “मी या कायद्यांचा विरोध करतो. आता मी भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या प्रश्नांची उत्तरेच देणार नाही. ते काही माझे प्राध्यापक नाहीत. मी केवळ शेतकरी आणि देशाच्या प्रश्नांची उत्तरे देईन.”

तसंच, मोदी सरकारनं टप्प्याटप्प्यानं शेतकऱ्यांची वाट लावण्यास घेतली आहे. ते केवळ तीन कायद्यांवर थांबणार नाहीत तर शेतकऱ्यांची वाट लावूनच थांबणार आहेत. संपूर्ण देशाची शेती आपल्या तीन चार मित्रांच्या हवाली करण्याचा त्यांचा डाव असल्याचा आरोपही राहूल गांधींनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मिळालेला हा विजय सर्व भारतीयांच्या लक्षात राहील- उद्धव ठाकर

कांगारूंचा पराभव केल्याने पंतप्रधान मोदींचीही भारतीय संघावर कौतुकाची थाप; म्हणाले..

अर्णब गोस्वामींच्या समर्थनात उतरलेल्या भाजप नेत्यांवर रोहित पवारांनी साधला निशाणा, म्हणाले…

ग्राहकांचा प्रतिसाद न मिळाल्यानं भारताच ‘हे’ मॅसेजिंग अ‍ॅप कायमचं होणार बंद

‘गाबा’चा घमंड उतरवलाच! भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत जिंकली मालिका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या