“शरद पवारांचे आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम जनतेला कळत नाही का?”
पुणे | राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पुण्यातील मेट्रोचा प्रवास केला. पिंपरी चिंचवड ते फुगेवाडी मेट्रो असा प्रवास आज शरद पवार यांनी केला आहे. आता यावरुनही राजकारण पेटल्याचं चित्र आहे. अशातच आता यावरुन भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम जनतेला कळत नाही का? पिंपरी चिंचवड मेट्रोची ट्रायल कुठल्याही स्थानिक खासदार, आमदाराला न कळवता राज्यसभेचे सदस्य शरद पवार यांच्या कशी होऊ शकते, असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
पुढे त्यांनी म्हटलं की, केंद्रात 10 वर्षे आणि महाराष्ट्रात 15 वर्षे राज्य असताना तुम्ही हा प्रकल्प का नाही केला? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. त्यामुळे मी सगळ्या आमदारांना आवाहन करतो की त्यांनी मेट्रोच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करावा.
दरम्यान, अशाप्रकारे घाईघाईने ट्रायल करण्याचे कारण काय असा माझा प्रश्न विचारत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना लक्ष केलं आहे.
थोडक्यात बातम्या –
कोरोना नियम पाळून छत्रपती संभाजी महाराजांचा 342 वा राज्यभिषेक सोहळा थाटामाटात साजरा
“महिलांचा विनयभंग आणि पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या हरामखोराला सत्ताधारी पाठीशी घालतायेत”
Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा आजचे ताजे दर
मोठी बातमी! नितेश राणेंना पुन्हा न्यायालयाचा दणका
जेष्ठ नेते प्राध्यापक एन. डी. पाटील यांचं दुःखद निधन
Comments are closed.