मुंबई | नविन कृषी कायद्याविरोधात शेतकरी गेल्या 18 दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. सुरु असलेल्या याच आंदोलनावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे.
‘लोकहो, शेतकरी मरत आहे!, नवे कृषी कायदे म्हणजे शेतीचे थडगे आणि शेतकऱ्यांचे मरण आहे. असे ज्यांना वाटते, त्यांनी हा विषय लोकांना समजावून सांगायला हवा’, अशा शब्दात संजय राऊत यांनी नव्या कृषी कायद्याची माहिती असणाऱ्या लोकांना आवाहन केलं आहे.
सामनातील रोखठोक या सदरात राऊत यांनी तिन्ही कायद्यांची समिक्षा केली आहे. तसेच पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांचे प्रश्न हे देशातील शेतकऱ्यांचे प्रश्न नाहीत, असे आपल्या प्रिय मोदी सरकारने ठरवून टाकले असल्याचेही राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, दिल्लीत आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांचा 19 वा दिवस आहे. लवकरच या सगळ्यावर तोडगा निघू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
थोडक्यात बातम्या-
“काँग्रेसच्या ‘या’ नेत्यामुळे शरद पवारांचं पंतप्रधानपद हुकलं”
‘…तर तुम्हाला आज धनंजय मुंडे दिसला नसता’; धनंजय मुंडेंचं मोठं वक्तव्य
‘या’ राज्यात नागरिकांना कोरोना लस मिळणार मोफत, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा
“देशात एकच राज्यपाल आहेत आणि तेच सर्व निर्णय घेतात, असं या रामाला वाटत असावं”
‘हे सत्ताधारी आहेत की गुंडांची फौज?’; शिवसेना नेत्याने दिलेल्या धमकीवर भाजपचा सरकारवर निशाणा