बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आमच्या धर्माचा अपमान होत आहे म्हणत तरूणीला जबरदस्तीने काढायला लावला बुरखा… पाहा व्हिडीओ

भोपाळ | धर्माचा संशय आल्याने तरूणीला भररस्त्यात जबरदस्तीने बुरखा काढायला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी या घटनेबद्दल तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

भोपाळमधील इटखेडी भागात एक प्रेमी जोडपं स्कुटीवरून फिरायला म्हणून गेलं होतं. त्यावेळी काही लोकांनी त्या दोघांना अडवून त्यातील तरूणीला “तुम्ही आमच्या धर्माचा अपमान करत आहात, त्यामुळे तुम्ही बुरखा काढा” असं सांगत तिला जबरदस्तीने बुरखा काढायला लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

तरूणीने खूप वेळ बुरखा काढण्यास नकार दिला, परंतु त्या लोकांनी जबरदस्ती करून तिला बुरखा काढायला लावला.  त्यानंतर तिच्या चेहऱ्यावर बांधलेला कपडा उतरविण्यासही ते लोक सक्ती करू लागले. यावर तरूणाने आक्षेप घेतला. परंतु त्या लोकांनी जास्तच सक्ती केल्यानंतर शेवटी ते जोडपं तिथून कसंबसं निघून गेलं.

ही संपूर्ण घटना मोबाईलमध्ये कैद झाली असून व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर इटखेडी पोलिस स्टेशनमध्ये 2 जणांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या घटनेचा निषेध व्यक्त केलाय.

पाहा व्हिडीओ

थोडक्यात बातम्या-

“चोरांना आणि त्यांच्या सरदारांना हिशोब द्यावाच लागेल”

…अन् क्षणात भलं मोठं घर कोसळलं, पाहा केरळमधील थरारक व्हिडीओ

भाजपला मोठा धक्का; ‘या’ दोन मोठ्या नेत्यांचा पक्षाला रामराम

“पवारांचा एकेरी उल्लेख करणं पाटलांना शोभतं का? कुठे हिमालय, कुठे टेकाड टेंगूळ”

“ईडी, सीबीआय यांच्यासह किरीट सोमय्यांना जम्मू-काश्मिरला पाठवा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More