काय सांगता! लोकांना सापडलाय सोन्याचा डोंगर, सोनं लुटण्यासाठी तुफान गर्दी, पाहा व्हिडीओ
नवी दिल्ली | सोनं म्हटलं की प्रत्येकाला त्याची किंमत जाणून घ्यावीशी वाटते. सोनं हा एक मौल्यवान धातू तर आहेच मात्र सध्या सोन्याचे भाव हे गगनाला भिडले आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सोनं आवडत नाही असं कोणीच नाही. प्रत्येकाला हे सोनं खरदी करावसं वाटतं.
कारण सर्वसामान्यांसाठी आत्ता चालूचे दर म्हणजे खूप मोठी रक्कम आहे. परंतू जर तुम्हाला सोन्याचा डोंगर मिळाला तर तुम्ही काय कराल?, प्रत्येकजण जितकं जमेल तितकं सोनं आपल्या घरी नेण्याचा प्रयत्न करेल. तुम्हावा विश्वास बसणार नाही पण खरं आफ्रिकेमध्ये असा डोंगर सापडल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
आफ्रिकेच्या काँगोमध्ये सोनं खोदण्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पत्रकार अहमद अल्गोहबारी यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर ट्विट केला असून त्याला, सोन्यानं भरलेला डोंगर पाहून काँगोच्या ग्रामस्थांना धक्का बसला आहे. मध्य आफ्रिकेच्या काँगोमध्ये एक डोंगर सापडला आहे. ज्यामध्ये 60 ते 90 टक्के सोने असल्याचं सांगितलं जात आहे, असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे.
दरम्यान, काँगो देशाच्या बर्याच भागात सोन्याचं अस्तित्व आहे. त्यामुळे तिथं सोन्याची खाण असणं ही सामान्य बाब आहे. मात्र लोकांनी सोनं लुटण्यासाठी तुफान गर्दी करत खाणकाम करण्यास सुरूवात केली आहे. या गर्दीमुळे सध्या लोकांना खाणकाम करण्यास मनाई घालण्यात आली आहे.
A video from the Republic of the Congo documents the biggest surprise for some villagers in this country, as an entire mountain filled with gold was discovered!
They dig the soil inside the gold deposits and take them to their homes in order to wash the dirt& extract the gold. pic.twitter.com/i4UMq94cEh— Ahmad Algohbary (@AhmadAlgohbary) March 2, 2021
थोडक्यात बातम्या-
…म्हणून राज ठाकरे मास्क घालत नसतील- रामदास आठवले
#Corona पुण्यात आजही कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या सविस्तर आकडेवारी
राज्यातील ‘हा’ जिल्हा प्रत्येक शनिवार, रविवार राहणार पूर्ण बंद
“मी कधीही विचार केला नव्हता की देशातील सर्वात मोठ्या नेत्यासोबत बसायला मिळेल”
राज ठाकरेंच्या पत्रानंतर ‘नाणार’वासीय म्हणतात; ‘गुजराती मारवाड्यांच्या गुंतवणुकीत अडकलेला पैसा….’
Comments are closed.