गुजरातमधील लोक होतायेत दिवसेंदिवस श्रीमंत!
नवी दिल्ली | महाराष्ट्र (Maharashtra) आणि गुजरात (Gujrat) या दोन राज्यांमध्ये सुरूवातीपासूनच उद्योग आणि गुंतवणुकीसाठी स्पर्धा आहे. तसं पाहायला गेलं तर ही दोन्ही राज्य एकमेकांचे शेजारी. पण वेगानं शहरीकरण झालेल्या या राज्यांमध्ये वर्षानुवर्षांपासून सुरू असलेली ही स्पर्धा अधिकच तीव्र होत चाललीये.
महाराष्ट्रात येणारे दोन प्रकल्प गुजरातकडे गेले आणि यावेळी दोन राज्यांमधल्या या अटीतटीच्या स्पर्धेला राजकीय वळण लागल्याचं आपण सगळ्यांनीच पाहिलं. पुण्याजवळ प्रस्तावित असलेल्या ‘वेदांता-फॉक्सकॉन’ हा सेमीकंडक्टर प्रोजेक्ट गुजरातच्या ढोलेरामध्ये गेला. तर नागपूरमध्ये प्रस्तावित टाटा-एअरबस विमान प्रोजेक्ट गुजरातमधल्या बडोद्यात. या दोन मोठ्या घडामोडींनंतर मुंबई आणि महाराष्ट्राचं महत्त्व कमी करुन गुजरातचं महत्व वाढवलं जातं आहे, अशा प्रकारचा सूर महाराष्ट्रात उमटू लागला.
उद्योग आणि गुंतवणुकीवरून या दोन राज्यांमध्ये स्पर्धा असतानाच आता गुजरातमधलेच लोक आणखी श्रीमंत होत असल्याचं समोर आलंय. हे प्रकरण काय आणि या सगळ्यात महाराष्ट्राची स्थिती काय ते आपण या व्हिडीओतून जाणून घेऊ.
थिंक टँक पीपल रिसर्च ऑन इंडियाज कन्झ्युमर इकॉनॉमीने (PRICE) 2021 मध्ये 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या जवळपास 63 शहरांमध्ये सर्वे केला होता. यातून आर्थिक विकासाला गती देण्यासाठी देशातला मध्यमवर्ग काम करत असल्याचं आता समोर आलंय.
फक्त मेट्रोसिटी नाही पण देशात सगळीकडेच आज श्रीमंत लोक राहात आहेत जे वेगवेगळ्या माध्यमातून देशाच्या आर्थिक विकासाला चालना देत आहेत. थोडक्यात काय तर देशातली छोटी छोटी शहरं पण आता कमाईच्या बाबतीत मागे राहिली नाहीयेत.
त्यामुळेच गुजरातमधील एक शहर आहे जे दिवसेंदिवस आणखीनच श्रीमंत होत चाललंय. गुजरातमधल्या सुरतसारख्या (Surat) शहरात आता सुपर रिच लोकांच्या प्रमाणात वाढ झालीये. एवढंच नाही पण 2015-16 आणि 2020-21 दरम्यान सुरतमधील अतिश्रीमंत कुटुंबांच्या संख्येत पण झपाट्यानं वाढ होतीये.
दुसऱ्या शहरांबद्दल बोलायचं झालं तर सुरत पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आहे बंगळुरू. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर अहमदाबाद आणि नाशिक, चौथ्या क्रमांकावर चेन्नई, पाचव्या क्रमांकावर पुणे, सहाव्या क्रमांकावर कोलकाता, सातव्या क्रमांकावर नागपूर, आठव्या क्रमांकावर मुंबई आणि शेवटी दहाव्या क्रमांकावर आहे ते म्हणजे दिल्ली. आता या शहरांमध्ये राहणाऱ्या एकूण लोकसंख्येपैकी 27 टक्के नागरिक हे मध्यमवर्गीय आहे. महत्त्वाचं म्हणजे देशाच्या या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी देशातला हाच मध्यमवर्ग काम करत असल्याचा दावा या सर्वेतून करण्यात आलाय.
नागपूर, नाशिक,भोपाळ, इंदूर, जयपूर, कन्नूर, कोची, लखनौ, मदुराई, मलप्पुरम, तिरुअनंतपुरम, कोईम्बतूर, कोझिकोड, त्रिशूर आणि तिरुपूर ही शहरं आता तरुण लोकसंख्या असलेली मोठी बाजारपेठ म्हणून उदयास येत आहे. या शहरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांच्या उत्पन्नात पण झपाट्यानं वाढ होतीये.
मुंबईत सध्या 2.7 लाख अतिश्रीमंत कुटुंबं आहेत ज्यांचं वार्षिक उत्पन्न हे 2 कोटींहून अधिक आहे. तर सुरत शहरात अशी 31 हजार अतिश्रीमंत कुटुंबे आहेत ज्यांची संख्या अल्पावधीतच वाढली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.