बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ वयोगटातील लोकांना डेल्टा व्हेरियंटचा सर्वाधिक धोका; महत्वाची माहिती आली समोर

नवी दिल्ली | कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं चित्र असतानाच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. तसेच कोरोना विषाणूचे डेल्टा आणि डेल्टा प्लस हे नवे व्हेरियंट धोकादायक ठरण्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. अशात महत्वाची माहिती आली समोर.

इंग्लंडमधील अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोना विषाणूच्या सर्व प्रकारात डेल्टा व्हेरियंट मुख्य आहे. डेल्टामुळे इंग्लंडमध्ये 117 लोकांचा बळी गेला असून त्यातील बहुतेक लोक 50 वर्षांपेक्षा अधिक वयाचे होते. यामध्ये 38 लोकांनी लस घेतलेली नव्हती, तर 50 लोकांना दोन्ही डोस मिळाले होते. तर 50 वर्षांपेक्षा कमी वयाचे 6 लोक होते, ज्यांना लस दिली गेली नव्हती आणि दोघांना लसीचा एक डोस मिळाला होता. दैनिक भास्करनं याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे.

50 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक, तरुण, लस न घेतलेले तसंच लसीचा एकच डोस मिळालेले लोक अशांना या डेल्टा व्हेरियंटच्या संक्रमणाचा सर्वाधिक धोका असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

डेल्टा प्लस व्हेरियंट अतिशय वेगानं आणि सहजपणे फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो, असं नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑफ इम्यूनायझेशनचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या- 

हिवाळी अधिवेशनाची तारिख ठरली; ‘या’ तारखेपासून नागपूरात होणार अधिवेशन

“तुम्ही 19 आमदारांचं निलंबन केलं तेव्हा काय लोकशाहीचं सामूहिक हत्याकांड होतं काय?”

काँग्रेसच्या माजी मंत्र्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र; केली ‘ही’ मागणी

…तर भाजपचे 12 नव्हे, 18 आमदार निलंबित झाले असते- अजित पवार

‘पीक विम्याच्या बीड पॅटर्नमुळे सरकारचा फायदा’; दरेकरांचा गंभीर आरोप

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More