बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जोर लगाके हैशा! लोकं बघत राहिली पण युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी करून दाखवलं

पुणे | तौक्ते चक्रीवादळाने आता महाराष्ट्रात प्रवेश केला असून रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर आणि इतर भागात चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात या चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणात वेग घेतल्यानं किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर पुण्यात देखील सोसाट्याच्या वाऱ्यानं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मोठंमोठी झाडं पडल्याचं देखील दिसलं आहे. अशातच खेडच्या कशेडी घाटात एक मोठं झाड पडल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला होता.

कशेडी घाटात झाड पडल्यामुळे जवळजवळ 1 तास वाहतूक खोळंबली होती. तरीही लोकांनी वाहनाबाहेर पडून जाण्यासाठी मार्ग काढला नाही. लोकं गाड्या माघारी फिरवू लागली. त्यामुळे घाटात गर्दी झाली. झाड पडल्यानं वाहतूक खोळंबा झाल्याचं कळताच खेड तालुका युवासेना व युवतीसेनेचे कार्यकर्ते मदतीला धावले. अनेकदा प्रयत्न करून देखील हे झाड हललं नाही.

त्यानंतर यांनी एकीचं बळ दाखवत झाड हलवलं. वाहतूकीत अडकलेल्या लोकांनी सुटकेचा श्वास घेतला. त्याचबरोबर त्यांनी घाट वाहतुकीस मोकळा करून दिला. या कार्यकर्त्यांनी पुढे सरसावून भलं मोठं झाड बाजूला करून मदत केल्याबद्दल शिवसेनेनं त्यांचं कौतुक देखील केलं आहे.

यावेळी युवासेना जिल्हाध्यक्ष अजिंक्य मोरे, तालुका सचिव राकेश सागवेकर, शहराध्यक्ष सिद्धेश खेडेकर, शहर सचिव  प्रसाद पाटणे, उपशहराध्यक्ष आदित्य चिखले, युवतीसेना शहराध्यक्ष पूनम जाधव, सिद्धी शिंदे, लीना खेडेकर उपस्थित होते.

थोडक्यात बातम्या-

एकमेकांवर दोषारोप करण्याचा किंवा बोटं दाखविण्याचा हा काळ नाही- मोहन भागवत

हवामानाची माहिती देत असतानाच महिला अँकरसोबत घडलं असं काही की…; पाहा गंमतीशीर व्हिडिओ

लाॅकडाऊनचा सकारात्मक परिणाम?; मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस घट

तौक्ते चक्रीवादळाने घेतला वेग; ‘या’ जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान, विजपुरवठाही खंडीत

कोरोना रुग्णांसाठी भन्नाट कल्पना; कोविड सेंटरमध्येच उभारलं ग्रंथालय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More