बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यात ‘कोरोना’चं थैमान; पाळीव प्राण्यांनाही ‘कोरोना’चा फटका

अमरावती | कोरोना व्हायरस प्राण्यांमधून पसरत नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलं आहे. मात्र अनेक लोक कुत्र्यांसह घरातील पाळीव प्राण्यांना घरात ठेवण्यास नकार देत आहेत.

आता कोरोना व्हायरसचा फटका प्राण्यांनाही बसू लागला आहे. याच गोष्टींचे परिणाम लक्षात घेता अमरावतीमध्ये युवा कट्टा फिश एक्वेरियम अँड पेट शॉपचे संचालक समीर जनवंजाळ यांनी एक भावनिक आवाहन केलं आहे.

कोणीही आपले पाळीव प्राणी बाहेर रस्त्यावर किंवा जंगलात न सोडता आम्हाला दत्तक द्या. आम्ही त्याना पोसतो असं समीर जनवंजाळ यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, अनेक जण या सर्व पाळीव प्राण्यांना जंगलात किंवा इतर ठिकाणी सोडत आहे. त्यामुळे हे पाळीव प्राणीसुद्धा बेघर होत आहे. या पाळीव प्राण्यांना वाऱ्यावर न सोडता मला दत्तक द्या, असं आवाहन अमरावतीमध्ये करण्यात येत आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

शहरातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी; गावाकडील शाळा मात्र सुरुच राहणार!

आम्ही अगदी सेम टु सेम कॉपी… फडणवीसांसोबतचा टिकटॉक ‘हा’ व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

महत्वाच्या बातम्या-

“सर्व बोर्डाच्या परीक्षा व विद्यापीठाच्या परीक्षा ठरल्याप्रमाणे होतील”

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता शहरातले मॉल्स देखील बंद राहणार!

‘चासकमान’साठी भूसंपादन चुकीच्या पद्धतीने; पवारांची पुनर्वसनमंत्र्यांशी चर्चा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More